या देशात लग्नानंतर तीन दिवसांपर्यंत वधू- वरांना शौचालयात जाण्यास मनाई असते, कारण…
मित्रांनो देवाने बनवलेल्या या सुंदर जगात अनेक नवनवीन रितीरिवाज व परंपरा आहेत. ज्यांचा बरेचदा आपल्याला अक्षरशः खूप कंटाळा येतो. पण तरीही आपण परंपरागत चालत आलेल्या या रुढी अवश्य पाळतो. लग्न म्हटलं की धम्माल, मौजमस्ती असते. प्रत्येक धर्म, समाज आणि देशात विवाहाच्या अनेक रीती व परंपरा असतात. जे पाहून आपण कित्येकदा आश्चर्यचकित होतो.
काय तुम्हांला ठाऊक आहे का, आपल्या जगात असा एक देश आहे. जिथे लग्न झाल्यावर नवरदेव आणि नवरी यांना तीन दिवस शौचालयात जाण्याची परवानगी मुळीच नसते. नवविवाहित दाम्पत्यावर या तीन दिवसांत पाबंदी लावण्यात येते. हे ऐकून तर तुम्ही देखील थक्क झाले असाल की, हे असे कसे आहेत बरं रितीरिवाज.
कशाप्रकारे येथील लोक या परंपरा निभावत असतील. लग्नानंतर या अनोख्या परंपरा ह्या इंडोनेशियाच्या टीङॉन्ग नावाच्या समुदयात निभावल्या जातात. ही परंपरा पती व पत्नी हे दोघेही आवर्जून निभावतात.
या परंपरेच्या मागे कारण असे आहे की, लग्नाच्या पवित्र वातावरणात जर वधू आणि वर हे शौचालयात गेले, तर त्यांची पवित्रता अशुद्ध होते. यासाठी लग्नानंतर तीन दिवसांपर्यंत वधू- वरांना शौचालयात जाण्यास मनाई केली जाते. तरीदेखील कुणी असे केले, तर तो अपशकुन मानला जातो.
इंडोनेशियाच्या टीङॉन्ग समाजातील लोकांचे या परंपरेमागील एक मुख्य कारण आहे. ते म्हणजे नवविवाहित दाम्पत्यांना वाईट नजरेपासून दूर ठेवणे. त्यामुळे जर ताबडतोब वधु- वर शौचालयात गेले, तर त्यांच्यावर नकारात्मकतेचा प्रभाव पडतो.
ज्यामुळे त्यांच्या दाम्पत्य जीवनात संकटे येऊ शकतात. नवविवाहितांचे नाते कमकुवत होऊन तुटण्याची शक्यता असते. यासाठी नवदाम्प्त्यांना लग्नानंतर तीन दिवसांपर्यंत कमी जेवण दिले जाते. ज्यामुळे त्यांना शौचालयात जाण्याची गरज भासणार नाही. येथे ही रीत खूप कडक पद्धतीने निभावण्यात येते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.