मेहुण्यांनी हात पाय बांधून कपडे फाटेपर्यंत दाजीला धुतलं, समोर आले ‘हे’ कारण
जयपूर: दोन तरुणांनी आपल्याच दाजीच्या तोंडात बोळा कोंबून मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यांनी दाजीचे हातपाय बांधून कपडे फाटेपर्यंत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा विडियो समाज मध्यंमावर वायरल होत आहे. पीडित व्यक्तीच्या नातेवाईकांनी हा व्हिडिओ शूट केला आहे.
ही घटना राजस्थान येथील भरतपुरमध्ये घडली आहे. पीडित व्यक्तीच्या नातेवाईकांनी हा विडियो शूट केला. हा व्हिडिओ पोलिसांना दाखवत पीडित व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्या दोघांविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
पीडित व्यक्तीचे नाव टिंकू आहे. तक्रारीमध्ये त्याने म्हटले आहे की, त्याच्या पत्नीच्या 2 भावांनी घरात घुसून त्याचे हात-पाय बांधले आणि तोंडात बोळा कोंबून अमानुष मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असून, मारहाण करणार्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमकं काय आहे प्रकरण?
प्राप्त महितीनुसार, पीडित टिंकूचे 2 वर्षापूर्वी लग्न झाले होते. मात्र तो कोणत्या न कोणत्या कारणामुळे पत्नीसोबत भांडण करत असे आणि त्याच्या पत्नीला नेहमी मारहाण करत असल्याचा टिंकूवर आरोप आहे. त्याच्या मारहाणीला कंटाळून त्याच्या पत्नीने ही गोष्ट तिच्या भावांना सांगितली. यानंतर तिच्या दोन्ही भावांनी मिळून दाजीला जबरदस्त मारहाण केली. तो पळून जाऊ नये म्हणून त्याचे हातपाय बांधले व आवाज करू नये म्हणून तोंडात बोळा कोंबला. पीडित व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्या दोघांनी कोणाचेही न ऐकता मारहाण सुरूच ठेवली.
सध्या दोन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी टिंकुच्या पत्नीचा जबाब घेतला असता ती म्हणाली की, तिचा पती तिला नेहमी मारहाण करत असे. त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून तिने आपल्या भावांना ही गोष्ट सांगितली होती. पोलिसांनी व्हिडिओचा तपास आणि दोन्हीकडच्या लोकांची चौकशी सुरू केली आहे.