भाऊ कदमने कॉमेडी सोडून सुरू केला नवीन व्यवसाय? पहा काय आहे भाऊचा नवीन व्यवसाय…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मागील कित्येक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राला “चला हवा येऊ द्या” हा कॉमेडी शो खळखळून हसवत आहे. दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा म्हणून हा शो सर्वजण अगदी आतुरतेने पाहतात. याच कॉमेडी शो मधून कित्येक कलाकारांना एक नवी ओळख मिळाली आहे. यामधील एक नाव म्हणजे ‘भाऊ कदम’. भन्नाट विनोदी कला आणि परफेक्ट कॉमेडी टायमिंग यामुळेच भाऊ कदम यांचे नाव आज महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले आहे. इतकंच नव्हे तर स्टेजवर भाऊंची एन्ट्री होताच ताबडतोब टाळ्यांचा कङकङाट ऐकू लागतो.

अहो, परंतु तुम्हांला ठाऊक आहे का… सध्या भाऊ कदम हे खूपच चर्चेत येत आहेत. सोशल मीडियावर त्यांचा वायरल होणारा फोटो पाहून तर अगदी सर्वांनाच प्रश्न पडत आहेत. त्यांचा हा वायरल होणारा फोटो पाहून असे वाटते की भाऊ ने आपले प्रोफेशन बदलून दुसरे काही सुरू केलं की काय…

See also  अभिनेत्री शिवानी बावकर व शिव ठाकरे पडलेत एकमेकांच्या प्रेमात? त्यांचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

कारण भाऊ कदम च्या या नव्या फोटोत तो चक्क हेअर कटिंग करताना दिसत आहे. हा फोटो एका सलून मधील आहे. त्यामुळे भाऊ कदम आता कॉमेडी शो करायचे सोडून नवीन काही करणार का, हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. तर मित्रांनो हा वायरल होणारा भाऊ कदमचा फोटो पांङू या सिनेमाच्या दरम्यानचा आहे. काही BTS व्हिडीओ आणि फोटोज् अभिनेता कुशाल बद्रीकेने शेयर केले आहेत. हे फोटोज् कुशालने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेयर केले आहेत. यामध्ये भाऊ कुशालचे हेअर कटिंग करताना दिसत आहे.

हा फोटो शेयर करत त्याने कॅप्शन मध्ये पांङू च्या काही गोष्टी असे देखील लिहिले आहे. तसेच पुढे त्याने लिहिले आहे की,”मागील अनेक वर्षे मी आणि भाऊ एकत्र प्रवास करत आहोत. पांङू च्या निमित्ताने आमच्यातील बॉन्डिंग पुन्हा एकदा घट्ट झाले. त्यामुळे आता आम्ही केस कापायला सुद्धा एकत्र जातो. एकदा भाऊचं लवकर आटोपलं…आणि त्याने लगेच माझे केस कटिंग करायला घेतले. देवा रे….नशीब! माझे थोर म्हणून फक्त फोटोवर निभावले. नाहीतर चित्रपटात मी खूप विचित्र दिसलो असतो आणि भाऊने केसाने गळा कापला असता. त्यामुळे सध्या ह्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

See also  "मिसेस मुख्यमंत्री" मधील मुख्य अभिनेत्री पडली ह्या अभिनेत्याच्या प्रेमात, पाहा या लव्हबर्ङचे भन्नाट फोटोज्

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment