भाईजान सलमान खानने चक्क भाड्याने घेतला प्लॅट, यामागील कारण ऐकून तुम्ही देखील व्हाल हैराण!
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील बजरंगी भाईजान सलमान खान याचे जगभरात लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत. त्यामुळे सलमान विषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. हल्ली अभिनेता सलमान खान विषयी अशीच एक गोष्ट कानावर ऐकू येत आहे. ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. ती नेमकी कोणती गोष्ट आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक आहात ना….
मित्रांनो जसे की आपल्याला सर्वांना माहितच आहे, सलमान खान मागील कित्येक वर्षांपासून वांद्रे भागातील गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये राहत आहे. परंतु याचा अर्थ सलमान कडे मुंबईत आणखी प्रॉपर्टी नाही, असा होत नाही. कारण मुंबईत तर त्याच्या अनेक प्रॉपर्टी आहेत. तरीही आता त्याने एक ङुप्लेक्स प्लॅट भाड्याने घेतला आहे. आता तुम्ही देखील विचार कराल की, सलमानने भाड्याने प्लॅट का बरं घेतला. त्याला असे करण्याची गरज का पडली असावी. तो गॅलॅक्सी मधून शिफ्ट होण्याच्या विचारात आहे का??
अहो, पण सलमान खान गॅलॅक्सी सोङून कुठेही जाणार नाही. सध्या त्याने हा प्लॅट भाड्याने राहण्यासाठी नव्हे तर एका वेगळ्या कामासाठी घेतला आहे. एका रियल इस्टेट पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार सलमान खानने वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने वांद्रे येथील मकबा हाइट्स येथे 17 व्या आणि 18 व्या माळ्यावर हा ङुप्लेक्स प्लॅट भाड्याने घेतला आहे. याचे भाङे करारपत्र सुद्धा समोर आले आहे. काँग्रेसचे नेते बाबा सिद्धीकी आणि झिशान सिद्दिकी यांचा हा प्लॅट आहे.
सलमान खानचे सिद्धीकी कुटुंबासोबत अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. कित्येकदा खान कुटुंब आणि सिद्धीकी कुटुंब हे एकमेकांसोबत पार्टी करताना दिसतात. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु या प्लॅट चे भाङे लाखाच्या घरात आहे. त्यासाठी सलमान खान दरमहिना 8 लाख 25 हजार भाङे मोजणार आहे.
रियल इस्टेट पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार 2 हजार 265 चौरस फूट कार्पेट एरिया असलेली ही मालमत्ता सलमान खानने 11 महिन्यांसाठी भाड्याने घेतली आहे. येथे सलमान खान स्वतः राहणार नाही. तर तो ङुप्लेक्स चा वापर कंपनीसाठी काम करणाऱ्या लेखकांसाठी करणार आहे.
सलमान खानच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले, तर तो सध्या बिग बॉस 15 होस्ट करतोय. लवकरच, त्याचा “अंतिम- द फायनल टूथ” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. महेश मांजरेकरचा दिग्दर्शित चित्रपट येत्या 26 नोव्हेंबरला रिलीज करणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये सलमान खान पोलिसाच्या भूमिकेत तर आयुष गुंडाच्या भूमिकेत आहे.
त्याशिवाय सलमान खान सध्या कैटरीना कैफ सोबत टायगर 3 च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. “कभी ईद कभी दिवाली” “किक 2” या सिनेमातही तो झळकणार आहे. शिवाय शाहरूख खानच्या “पठाण” या चित्रपटात तो कॅमियो करणार आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.