‘बुलेट थाळी चॅलेंज’! १ तासात थाळी फस्त करा आणि चक्क फ्री मिळवा “रॉयल एनफिल्ड बुलेट”

क’रो’ना’चा क’ह’र आणि केल्या गेलेल्या लॉ’क’डा’उ’न’मु’ळे देशभरातील हॉटेल उद्योग बंद झाले होते व काही तोट्यात चालत होते. अनलॉकनंतर हॉटेल्स पुन्हा सुरू झालेत, परंतु ग्राहकांचा अजूनही हवा तसा रिस्पॉन्स मिळत नसल्याने पुण्याच्या एका हॉटेल मालकाने भन्नाट शक्कल लढवली आहे.

वडगाव-मावळमधील सुप्रसिद्ध हॉटेल शिवराजचे मालक अतूल वायकर हे देखील इतर हॉटेल व्यवसायिकांसारखे को’रो’ना लॉ’क’डा’ऊ’न’मु’ळे त्र’स्त होते. हॉटेलकडे ग्राहक फिरकतच नसल्याने कर्मचाऱ्यांचा पगार आणि रोजचा खर्चही निघत नव्हता. आता काय करावे असा विचार करत असताना अ’चा’न’क अतुलशेठ वायकर यांच्या डोक्यात एक ‘भन्नाट आयडिया’ आली.

आपल्या हॉटेलकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी एक जबरदस्त आणि अभिनव ऑफरची घोषणा केली. “बुलेट थाळी चॅलेंज”. जो ग्राहक हॉटेल शिवराजची “स्पेशल ‘बुलेट थाळी” १ तासात संपूर्ण फस्त करेल त्याला १ लाख ६५ हजार रुपयांची नवीकोरी रॉयल एनफिल्ड बुलेट फ्री बक्षीस म्हणून दिली जाईल.

स्पेशल बुलेट थाळी खाण्यासाठी अतुलशेठ वायकरांनी काही अटी ठेवल्या आहेत.

एकाच व्यक्तीला ही थाळी खावी लागेल.
संपूर्ण थाळी संपवण्यासाठी त्याला १ तासाचा वेळ मिळेल.

हॉटेल शिवराजच्या या ऑफरकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अतुलशेठ यांनी हॉटेलच्या बाहेर दर्शनी भागातच ५ नव्याकोऱ्या बुलेट उभ्या केल्या आहेत. बाहेर उभ्या असलेल्या बुलेट बघून अनेकजण या हॉटेलमध्ये स्पेशल थाळी संपवून बुलेट जिंकण्यासाठी येत आहेत. या बुलेट थाळीत इतके पदार्थ असतात की खाता खाताच त्यांना घाम फुटतो.

“काय आहे ही हॉटेल शिवराज स्पेशल बुलेट थाळी?”

ही स्पेशल बुलेट थाळी एक नॉन-व्हेज थाळी आहे. यामध्ये ४ किलो म’ट’ण आणि फ्रा’य म’च्छी’चे जवळपास १२ पदार्थ असतात. तब्बल ५५ कर्मचारी ही थाळी बनवण्यासाठी काम करतात. यामध्ये फ्रा’य सु’र’म’ई, पापलेट, चि’क’न तं’दू’री, ड्राय म’ट’ण, ग्रेव्ही म’ट’ण, चिकन मसाला आणि कोळंबी व बि’र्या’णी यांसारखे चमचमीत पदार्थांची रेलचेल आहे.

हॉटेल शिवराजने ही ऑफर आणल्यापासून हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे. तरीही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं काटेकोर पालन केलं जातं. दिवसाला ६५ थाळी संपतात असं अतुलशेठ वायकर यांनी सांगितलं.

शिवराज हॉटेलमध्ये बुलेट थाळीव्यतिरिक्त पाच प्रकारच्या महाकाय थाळी मिळतात. यात विशेष रावण थाळी, मालवणी मच्छी थाळी, पहलवान म’ट’ण थाळी, बकासूर चि’क’न थाळी आणि सरकार म’ट’ण थाळी. बुलेट थाळीसह प्रत्येक थाळीची किंमत दोन हजार पाचशे रुपये (२,५००) आहे.

शिवराज हॉटेलने यापूर्वीही अशीच एक स्पर्धा ठेवली होती. यामध्ये चार लोकांनी मिळून एका तासात आठ किलो रावण थाळी खाण्याची आवश्यकता होती. त्यावेळी विजेत्याला 5000 रुपये रोख देण्यात आले तसेच थाळीचे पैसेही त्याच्याकडून आकारण्यात आले नाही.

“बुलेट थाळी चॅलेंज’ विजेता”

महत्वाचे असे की, ही स्पेशल बुलेट थाळी स्पर्धा सुरू झाल्यापासून ही महाकाय थाळी फक्त एकच व्यक्ती एका तासात पूर्ण खाण्यात यशस्वी ठरला आहे. सोलापूरच्या श्री. सोमनाथ पवार यांनी ही बुलेट थाळी एका तासात फस्त केली.

त्या बदल्यात श्री. सोमनाथ पवार यांना लगेचच एक बुलेट गिफ्ट म्हणून देण्यात आली अशी माहिती अतुल वायकर यांनी दिली. दरम्यान, सोशल मीडियामध्ये ‘बुलेट थाळी’ची चर्चा सुरू झाल्यापासून बुलेट जिंकण्यासाठी शिवराज हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment