महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा केंद्रीय समितीची सल्ला, या जिल्ह्यांतील कोरोना परिस्थिती चिंताजनक

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मुंबई: राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट कमी झाली असून, राज्यातील नवीन रुग्णवाढीचा दरही कमी होत आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. या ठिकाणी रुग्ण कमी होताना दिसत नाहीत. दरम्यान, कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी गठित केंद्रीय समितीने महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा दौरा केला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती राज्यासाठी चिंतेचा विषय बनली आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय समितीने दोन्ही जिल्ह्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याचे सुचविले आहे.

सांगली-कोल्हापूरवर पुन्हा लॉकडाऊनचे सावट…

सांगली आणि कोल्हापुरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व पावले उचलली जात असूनही वाढत्या संसर्गाबाबत केंद्रीय समितीने चिंता व्यक्त केली. तसेच या जिल्ह्यातील आरोग्य अधिकार्‍यानी केंद्रीय समितीच्या पूर्ण अहवालाची वाट पाहत असल्याचे सांगितले. अहवाल आल्यानंतर पुन्हा कडक लॉकडाउन करायचा की नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

See also  15 मे नंतर लॉ'कडा'ऊन वाढणार का? जाणून घ्या काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे...

10 जिल्ह्यात पॉजिटिवीटी दर जास्त…

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, “राज्यातील केवळ 10 जिल्ह्यातच पॉजिटिवीटी दर जास्त आहे. बाकी जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. केंद्रीय समितीने पॉजिटिवीटी दर जास्त असणार्‍या काही जिल्ह्यांचा दौरा केला आहे. त्यांनी या जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना चाचणी, संपर्क ट्रेसिंग आणि लसीकरण प्रभावी उपाय आहेत. आम्ही सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहोत.”

टोपे पुढे म्हणाले, “मी लवकरच दिल्लीला जाणार असून, राज्याला कोरोना लसीचा पुरवठा वाढवण्याची मागणी केंद्राकडे करणार आहे.”

नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल डायरेक्टर डॉ. सुजित सिंग यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कोरोनाचा दूसरा वेरिएंट तर नाही ना! ज्याच्यामुळे येथील कोरोना प्रकरणे कमी होत नाहीत. याबाबत राज्यातील संबंधित अधिकारी तपास करत आहेत”

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment