चॅम्पियन CSK टीमला 20 करोड रुपयांचा इनाम, तर फायनल मध्ये हरलेल्या KKR टीमला सुद्धा मिळाले हे इनाम, ऐकून व्हाल तुम्ही थक्क

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आयपीएल म्हटलं की अगदी सर्वांच्या अंगात एक वेगळाच जोश निर्माण होतो. कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ला IPL- 14 च्या फायनल मध्ये जबरदस्त टक्कर देऊन चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांनी शानदार आयपीएल ट्रॉफी जिंकली. सलग चौथ्यांदा त्यांनी ही बाजी मारली आहे. याआधी देखील चेन्नई ची टीम 2010, 2011 आणि 2018 मध्ये चॅम्पियन ठरली होती.

आयपीएलच्या या 14 व्या सीझन च्या फायनल नंतर अफलातुन पारितोषिकांचा वर्षाव सुरू झाला. चॅम्पियन सुपर किंग्स टीमला 20 करोड रुपयांची रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आली. तर फायनल मध्ये हरलेल्या KKR टीमला 12.5 करोड रुपयांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.

See also  खुशखबर ! आयपीएल 2022 आता "टाटा" च्या नावाने ओळखले जाणार, निर्णय झाला अखेर फायनल...

आयपीएल 2021 मध्ये सर्वांत जास्त रन बनवणारा CSK चा जिगरबाज पठ्ठ्या ऋतुराज गायकवाड याने 635 रन करत आँरेंज कप पटकावला. त्याला 10 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. त्याचसोबत त्याने इमर्जिंग प्लेयरचा अवॉर्ड (10.00.000 रु.) देखील मिळवला.

फक्त दोन रणांच्या फरकाने आयपीएल 2021 मध्ये सर्वांत जास्त रण बनवून आँरेंज कप पटकावणाऱ्या ऋतुराजने म्हटले की,”टीम चॅम्पियन ठरल्याने खूप आनंद होत आहे.” ऋतुराज गायकवाडने टूर्नामेंट मध्ये 635 रण बनवले. त्याचबरोबर त्याचा सोबती फाफ ङू प्लेसिस हा 633 रन बनवत दुसर्या स्थानावर राहिला. चेन्नईने फायनल मध्ये कोलकाता नाइट रायडर्स ला 27 रणांनी हरवले.

मिळवलेली पारितोषिके :

  • चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स ला 20 करोड रुपयांचा चेक इनाम स्वरूपात मिळाला.
  • रनर्स – अप कोलकाता नाइट रायडर्स ला 12.5 करोड रुपयांचा चेक मिळाला.
See also  संजय राऊत यांचे मोठे विधान, म्हणाले 2024 साठी नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत ‘हे’ आहेत योग्य उमेदवार

आयपीएल मध्ये कोण आणि किती वेळा ठरले चॅम्पियन ??

  • मुंबई इंडियन्स : ही टीम 5 वेळा म्हणजेच 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या वर्षांत चॅम्पियन ठरली.
  • चेन्नई सुपर किंग्स : ही टीम 4 वेळा म्हणजेच 2010, 2011, 2018 आणि 2021 या वर्षांत चॅम्पियन ठरली.
  • कोलकाता नाइट रायडर्स : ही टीम 2 वेळा म्हणजेच 2012 आणि 2014 मध्ये चॅम्पियन ठरली.
  • सनराइजर्स हैदराबाद : ही टीम 1 वेळा 2016 मध्ये चॅम्पियन ठरली होती.
  • राजस्थान रॉयल्स : ही टीम 1 वेळा 2008 मध्ये चॅम्पियन ठरली होती.
  • ङेक्कन चार्जर्स : ही टीम 1 वेळा 2009 मध्ये चॅम्पियन ठरली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment