जो पर्यंत राज ठाकरे ‘हे’ काम करत नाहीत, तोपर्यंत मनसेसोबत युती अशक्य; चंद्रकांत पाटील यांनी केला खुलासा

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

नाशिक: भाजप पक्षाची विचारधारा ही हिंदुत्वाशी निगडीत आहे, हे सर्वश्रूत आहे. सारख्या विचारधारेच्या पक्षांची युती होत असते. मात्र, सारखी विचारधारा असूनही शिवसेनेने भाजपसोबत फारकत घेत भिन्न विचारसणीच्या कॉंग्रेस आणि राष्ट्रावादी कॉंग्रेस सोबत आपला संसार मांडला. शिवसेना वेगळी झाल्याने भाजपला राज्यातील एखाद्याला समविचारी पक्षाला जवळ घेणे गरजेचे बनले असून, अलीकडेच राज ठाकरे यांनीही हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे भाजप-मनसे युती बाबत नेहमी चर्चा सुरू असतात.

तोपर्यंत युती अशक्य…

पत्रकारांनी नाशिक दौर्‍यावर असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना मनसे सोबत युती होणार का ? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “जोपर्यंत राज ठाकरे त्यांच्या पक्षाचे परप्रांतीयांसंबंधी धोरण बदलत नाहीत, तोपर्यंत मनसेशी युती होणे शक्य नाही.”

See also  ट्रम्प यांच्या भारत भेटीत भारताने किती कोटी रुपये खर्च केले? आकडेवारी ऐकून चक्कर येईल!

राज ठाकरेंचे नेतृत्व महाराष्ट्राला हवे आहे, पण एकट्या राज ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार येणे अशक्य असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. जर योग आला तर नाशिकमध्ये राज ठाकरे यांची भेट घेऊ. असंही ते म्हणाले.

युती साठी नेहमीच दरवाजे खुले…

युतीविषयी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, “ भाजपचे राजकारण व्यापक आणि देशव्यापी आहे. जर राज ठाकरे यांनी व्यापक राजकरणात प्रवेश केला तर युती शक्य आहे. मनसेसोबत युतीसाठी भाजपने दरवाजे खूले ठेवले आहेत.”

पक्षाच्या संघटनात्मक बैठकी साठी नाशिक मध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी अनेक विषयांवर भाष्य केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीबाबत बोलताना ईडी स्वायत्त असल्याने मी त्याविषयी काही बोलू शकत नाही, असे सांगितले. शिवाय माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, जर काही घडलं नसेल तर, चौकशीला घाबरण्याचे कारण नाही. गैरकृत्य केलं नसेल तर चौकशीत काही निष्पन्न होणार नाही.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment