सुपरस्टार प्रभास सोबत या अभिनेत्रीचा फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कोण आहे ती अभिनेत्री?

सध्या सोशल मीडियावर प्रभास बद्दल बरीच चर्चा रंगली आहे. रसिकप्रेक्षकांच्या समोर अनेक नानाविध विषय त्याच्याबाबतीतले समोर येताना पहायला मिळत आहेत. तर ही खबर आहे एका जुन्या अभिनेत्रीबाबतची. जिने सिने चित्रपटांमधून तब्बल गेल्या 17 वर्षांपासून माघार घेतलेली आहे.

biharbook news161284674513

तुम्हाला कदाचित पुढे हादेखील आश्चर्याचा धक्का बसेल की, तिने आता 17 वर्षांनंतर पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतलेला दिसत असल्याची चिन्हे आहेत. चला तर मग आपण जाणून घेऊयात त्या अभिनेत्रीबाबत. या अभिनेत्रीचं नाव आहे अंशू अंबानी. तुमचा गैरसमज दुर करण्यासाठी सांगायच म्हटलं तर प्रसिद्ध व्यावसायिक अंबानी यांच्या कुटुंबातली ही कोणीही नाही. परंतु दाक्षिणात्य सिनेमांमधील ती एक चांगला परिचित असलेला चेहरा आहे.

अंशू अंबानी 2002 साली नागार्जुना या अभिनेत्याच्या मनमाधुदू या सिनेमात शेवटची दिसली होती. या चित्रपटाची पटकथा त्रिविक्रम यांनी लिहिली होती. आणि आता खास बात म्हणजे त्रिविक्रम यांना पुन्हा एकदा अंशू अंबानीसोबत काम करण्याची ईच्छा आहे. आज आणि नाही म्हटलं तरी गेल्या एक आठवड्याभरापासून अंशू अंबानी सोशल मीडियावर ट्रेंडींग विषय झाली आहे.

anshu ambani

आणि सोबतच तिचे बाहुबली सुपरस्टार प्रभास या अभिनेत्यासोबतचे फोटोजदेखील व्हायरल होत असल्याचे पहायला मिळत आहेत. अनेकजण तिचा सोशल मीडियावरूनही शोध घेत असल्याची गोष्ट पहायला मिळते आहे. चला तर मग आपण तिच्याबद्दल आणखी खास माहिती जाणून घेऊयात.

अंशू अंबानी ही दाक्षिणात्य सिनेमांमधील एके काळची अगदी लोकप्रिय असलेली अभिनेत्री होती. तिने 17 वर्षांआधी सिनेमा जगताला निरोप दिला होता. परंतु सध्या तिच्या पुनरागमनाच्या गोष्टी प्रखर्शाने समोर येत आहेत. कथा व पटकथा लेखक त्रिविक्रम निवास यांनी त्यांच्या आगामी सिनेमासाठी अंशू सोबत चर्चा केल्याची बाब समोर आली आहे.

Anshu%2BAmbani%2BSaree%2BPhotos%2B%25281%2529

या सिनेमामधे ज्युनियर एन टी आर या अभिनेत्यासोबत अंशू एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे. सिनेमा व त्याच्या स्टारकास्टबद्दल अजूनतरी कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या चर्चांना प्रचंड उधाण आलं आहे. शिवाय अंशूचे चाहते तिच्या आगमनाची वाट पाहत आहेत. अंशू व अभिनेता प्रभास यांनी राघवेंद्र या सिनेमात एकत्र काम केलं आहे.

याच सिनेमातील एकत्र असलेले प्रभाव व अंशू यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सिनेमानंतर मात्र फिल्मी झगमगाटापासून हळूहळू अंशू दूर राहू लागली होती. अंशू अंबानी हिचं 2003 साली लग्न झालं आहे. सध्या ती एका मुलीची आई आहे. आणि तिच्या कमबॅकच्या चर्चेवर तिचे चाहते प्रचंड सुखावले आहेत.

20180711 145234

अंशूचा मुळ जन्म हा लंडनमधील आहे. 2002 ते 2004 पर्यंत ती सिनेसृष्टीत एक्टीव्ह होती. जय, मिस्साम्मा या दोन सिनेमातही ती पहायला मिळाली होती. सध्या तिचा कपड्यांच्या व्यवसायातील एक ब्रॅन्ड चांगलाच प्रसिद्ध असल्याची खबरदेखील मिळाली आहे. मात्र तिची सिनेमात पुन्हा एन्ट्री होईल का? या गोष्टीवर सर्वच चाहत्यांच लक्ष राहिलं, हे नक्की.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment