‘नाळ’मधील चैत्या, सैराट फेम आर्ची (रिंकू) सोबत झळकणार या नवीन मराठी चित्रपटामध्ये, चित्रपटाचे नाव आले समोर…

आपल्या अतिशय निरागस आणि चुरचुरीत अभिनयाने पदार्पणातच आबालवृद्धांच्या गळ्यातील ताईत बनलेला मराठी बालकलाकार श्रीनिवास पोकळे म्हणजेच लाडका चैत्या छूमंतर या नव्या कोऱ्या चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे.

छूमंतर या नवीन चित्रपटाचे चित्रीकरण सध्या लंडन मध्ये सुरू आहे. लंडन येथे चित्रित होणारा हा पहिला मराठी चित्रपट असणार आहे. छूमंतर मध्ये सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेसोबतच सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटातील कलाकारांच्या लंडन येथील वास्तव्याचे काही फोटोज आणि व्हिडीओज त्यांनी स्वतः सोशल मीडिया वर अपलोड केले असून ते खूप वेगाने लोकप्रिय आणि व्हायरल होत आहेत. त्यामध्ये प्रार्थना, सुब्रत आणि यांच्या सोबत बालकलाकार श्रीनिवास पोकळे हा सुद्धा लंडन मध्ये मस्ती करतांना दिसत आहे. श्रीनिवास पोकळे छूमंतर चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे.

READ  'हे मन बावरे' या लोकप्रिय मालिकेतील या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं दुसऱ्यांदा लग्न, पहा लग्नाचे फोटो...

नुकतेच रिंकू राजगुरूने इंस्टा स्टोरीवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रिंकूसोबत श्रीनिवास मस्ती करताना दिसतो आहे. तसेच यापूर्वी अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा देखील श्रीनिवास सोबतचा फोटो सोशल मीडियावर पहायला मिळाला.

छूमंतर या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. एकंदरीतच मनोरंजक असणाऱ्या या चित्रपटात प्रार्थना बेहरे, रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना यांच्यासह चैत्याला एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे औत्सुक्याचे ठरणार आहे.

WhatsApp Image 2020 10 25 at 7.44.45 PM

नाळ या चित्रपटाला मराठी रसिक प्रेक्षकांचा प्रचंड उत्साहात प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे फाईंड असलेला चैतन्य म्हणजेच चैत्याच्या भूमिकेतील श्रीनिवास पोकळे हा बालकलाकार रसिकांना पाहायला मिळाला होता. नाळ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी श्रीनिवास केवळ आठ वर्षांचा होता. या चित्रपटातील त्याच्या कामाची सर्व स्तरातून खूप प्रशंशा झाली होती. या नंतर आता तो छूमंतर या मराठी चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे.

READ  को'रो'नातून बरा होऊन पुन्हा कामाला लागला हा प्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, "कामच केलं नाहीतर मग..."

छूमंतर चित्रपटाबद्दल ई टाइम्स या लोकप्रिय माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थना बेहरे म्हणाली की, जवळपास सहा महिन्यांहून जास्त लॉकडाउननंतर कामाला सुरूवात केल्यामुळे आम्ही सर्वच जण खूप आनंदी आहोत. मला वाटतं की छूमंतर हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्याचे परदेशात शूटिंग सुरू झाले आहे. त्यामुळे आम्ही खूप उत्सुक आहोत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  तज्ञ ते नटसम्राट म्हणून अजरामर कसे झाले डॉ श्रीराम लागूंनी, जाणून घ्या त्यांचा थक्क करणारा प्रवास...

Leave a Comment