लहान मुलांसाठीचे कोरोना लसीकरण ‘या’ महिन्यापासून सुरू होऊ शकते, जाणून घ्या पूर्ण माहिती

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नवी दिल्ली: कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हाच सर्वात महत्वाचा उपाय असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पूर्ण भारतभर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत भारतातील 42 कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोना लस देण्यात आली असून या वर्षाच्या अखेरीस सरकारने 18 वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, काही तज्ञांच्या मते कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असल्याचे म्हणणे आहे.  कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी माहिती दिली की सप्टेंबरपर्यंत मुलांसाठी कोरोना लस सुरू केली जाऊ शकते.

तिसर्‍या लाटेत मुलांना जास्त धोका…

See also  विराट कोहलीवर कोसळला दु:खाचा डोंगर, खूप जवळच्या व्यक्तीचे झाले निधन...

कोरोनाची दुसरी लाट अद्याप पुर्णपणे संपली नसली तरी तिसर्‍या लाटेसाठी तयार राहण्याचा इशारा देण्यात येत आहे. अनेक संशोधनांच्या अहवालानुसार तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक ठरू शकते अशी माहिती समोर आली. डॉ. गुलेरिया यांनी याविषयी बोलताना सांगितले की, मुलांची कोरोना लस संसर्गाची साखळी तोडण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल.

चाचणी पूर्ण झाल्यानंतर लगेच मिळू शकते परवानगी…

डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की झेडस कॅडिला या कंपनीने मुलांच्या लसीची चाचणी पूर्ण केली असून, ते आपतकालीन वापरासाठी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच भारत बायोटेकने मुलांसाठी तयार केलेल्या कोवॅक्सिन लसीची चाचणी ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये पूर्ण होईल. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता  पाहता चाचणीनंतर लगेचच या लसीला हिरवा झेंडा दाखविला जाईल. असेही ते म्हणाले.

See also  ‘तारक मेहता...’ मधील जेठालालची भूमिका नाकारल्याबाबत राजपाल यादव म्हणाले- मी प्रत्येक भूमिका...

अमेरिकेत फायझर लसीला मान्यता…

फायझरने तयार केलेल्या मुलांच्या लसीला यूएस हेल्थ एजन्सी फूड अँड ड्रग रेग्युलेटरने मान्यता दिली आहे. अशा परिस्थितीत सप्टेंबरपर्यंत मुलांची लसीकरण सुरू होण्याची अपेक्षा आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी लस महत्त्वपूर्ण मानली जाते.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment