टिकटॉक बॅन झाल्यावर ‘या’ ऍपची झाली चांदी! या भारतीय ऍपने कमावले करोडो रुपये…

.

टिकटॉक सोबत ५९ चायना ऐप ब्यान केल्यानंतर मेड इन इंडिया असलेलं शोर्ट व्हिडीओ शेयरींग ऐप ‘ चिंगारी ’ ने डाऊनलोडिंग नंतर मिळणाऱ्या पैश्यांच्या बाबतीत १.३ मिलियन डॉलर कमावले आहेत.

ही चिंगारी ऐपची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कमाई आहे. डाउनलोडिंग मध्ये झालेली वाढ ही टिकटॉक ब्यान केल्यानंतर झाली आहे. त्यात ऐप स्वदेशी असल्यामुळे अनेकांनी चिंगारी हेच वापरायचं ठरवलं.
चिंगारी ऐप ची निर्मिती बँगलोर मधील दोन प्रोग्रामर ने बनलेली आहे. ज्यांचं नाव आहे, बिश्वातमा नायक आणि सिदार्थ गौतम. चिंगारी हे ऐप १० भाषांमध्ये आहे. त्यामध्ये इंग्रजी, हिंदी, गुजराती, तमिळ, कन्नड, मराठी, मल्याळम, पंजाबी बंगला, तेलगु अश्या भाषेंचा समावेश आहे.

चिंगारी ऐप सगळ्यात पहिल्यांदा २०१८ ला गुगल प्ले स्टोअरवर आलं होतं. सुरुवातीला चिंगारी ऐप ला फारसं यश मिळालं नाही. टिकटॉक ला तोड देऊ शकलं नाही. पण भारतीय स्पर्धेतून टिकटोक गेल्यानंतर मात्र चिंगारी अव्वल नंबर वर आलेलं आहे. २०१८ ला ऐप गुगलप्ले स्टोअरवर आल्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये आईओएस साठी सुद्धा चिंगारी भारतात उपलब्ध झालं.
टिकटोक ला ब्यान केल्याने आता देशात पुढं नेमकं कोणतं ऐप येणार याची चर्चा असतानाच. आधी बाजारात आलेलं चिंगारी ऐप अचानक लोकं डाऊनलोड करू लागले. त्यामुळे ते खूप कमी दिवसात ट्रेंडीगलाही आलं.
फ्रान्सच्या सुरक्षा संशोधक रॉबर्ट यांनी असं म्हंटलं आहे की टिकटोक ला पर्याय म्हणून भारतीय चिंगारी हे ऐप ग्लोबसॉफटच्या वेबसाईटवरच्या मदतीने तयार झालेलं आहे.

त्यात जर काही अडचण येत असेल तर पुढील काही काळात ती अडचण सोडायचा आम्ही नक्की प्रयत्न करूत. म्हणजे आता चिंगारी ऐपचं शक्य तितक्या प्रमाणे टिकटोक ची कसर भरून काढू शकते.

भारतात टिकटॉक खूप कमी काळात प्रचंड व्हायरल झालं होतं. ज्याच्याकडे मोबाईल असायचा त्याच्याकडे ऐप नाही असं नव्हतं.

त्यामुळे एकट्या भारतीयांच्या जीवावर टिकटॉक ची कंपनी आणि मालक खूप पैसे कमवत होते. त्यात भारतात टिकटोक वापरून अनेक जण स्टार बनले होते. ज्याला पुढे एक वेगळच नाव पडलं ‘ टिकटॉक ’ स्टार. पण चायनासोबत केंद्र सरकारने घेतलेल्या टिकटोक आणि त्यासहित ५९ ऐप वरच्या बंदी मुळे सोशल मिडिया मार्फत होणारा चायना व्यापार तूर्तास तरी थांबलेला आहे. पण इकडं टिकटॉक स्टार असणाऱ्यांची खूप अडचण निर्माण झाली. मग त्यातून पर्याय म्हणून स्वदेशी वापरून आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने उचललेल्या पावलांत चिंगारी ऐपचं फावलं.

फक्त २२ दिवसांत चिंगारी ऐप ने १ करोड डाऊनलोडची संख्या पार केली होती. जी आधी २५ लाखांच्या आसपास होती. म्हणजे आधी खूप कमी लोकांनी चिंगारी डाउनलोड केलं होतं.

पण टिकटॉक पाहणाऱ्यांना त्याची झालेली अयालर्जी आता चिंगारी वापरून भागवावी लागत आहे.
चिंगारी ऐप बनवलेल्या कंपनीचे सहनिर्माता सुमित घोष यांचं म्हणणं आहे भारतात टिकटोक बंद झाल्यानंतर चिंगारी या स्वदेशी ऐप ला प्रत्येक तासाला १० लाखांपेक्षा जास्त व्युज मिळत आहेत. याचं सोबत त्यांनी पुढे म्हंटलं की चिंगारी ऐपच्या डाउनलोड ची जशी जशी संख्या वाढत आहे तसा कंपनीचा व्यवसाय वाढत आहे. फायदा होत आहे. त्यामुळे अजून जास्त लोकांशी आणि त्यांच्या ट्यालेंटशी जोडण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहुत आणि यात नवनवीन अपडेटिंग फ्यासिलीटी सुद्धा घेऊन येऊत.

चिंगारी हे ऐप सध्या वेंचर कैपिटलिस्ट, एंजेलिस्ट इंडिया, उत्सव सोमानी ची आईसलाईड, विलेज ग्लोबल या कंपन्यासोबत मिळून चालवत आहे. त्यावर हे सगळे काम करत आहेत. ऐपवर अजूनही नवनवीन फीचर्स देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम कंपनी संस्थापक आणि टीम करत आहे.
काही दिवसांपूर्वी ‘ आत्मनिर्भर भारत ऐप इनोवेशन च्यालेंज मध्ये सामाजिक श्रेणीत ’ चिंगारी ने स्वदेशी ऐप म्हणून २० लाखांचा पुरस्कार ही जिंकलेला आहे.

चीनच्या ऐप च्या बंदीनंतर भारतीयांचा आता स्वदेशी ऐप कडे कल वळला आहे. त्यात चिंगारी सध्या आघाडीवर आहे.
गुगल प्ले स्टोअर वर चिंगारी ऐप ला ४ स्टार मिळाले आहेत. टिकटटॉक ला पर्याय म्हणून चिंगारी भारतीयांच्या पसंतीस पडत आहे.

चिंगारी ऐप मध्ये भारतातील ट्रेंडीग न्यूज, मनोरंजनमधील ट्रेंडीग न्यूज आणि कॉमेडी व्हिडीओ सुद्धा पाहता येतात. त्याचं बरोबर त्यातील काही व्हिडीओ जर आवडले तर ते डाउनलोड करून सुद्धा घेता येतात.

चिंगारी मुळे तरी सध्या भारत स्वदेशी ऐप वापरून या बाबतीत आत्मनिर्भर बनलेला आहे. पण असे अजून अनेक टेक्नोलॉजीचे ऐप आहेत की जे भारताचे असणं खूप गरजेचं आहे.

भारताबाहेर खूप कमी प्रमाणात चिंगारी वापरलं जातं कारण तिकडं अजूनही टिकटॉक चालूच आहे. पण अमेरिकीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत बोललेल्या मुद्यांत असं म्हंटलं आहे की मायक्रोसॉफ्ट ने लवकरात लवकर चिंगारी खरेदी करावं. आणि टिकटॉक ने त्यांना किंवा दुसऱ्याला विकावं.

फक्त चायनाच्या कुणालाच विकणं शक्य होणार नाही. नाहीतर ऐप अमेरिकेत सुद्धा बंद होईल. आणि मग हळूहळू सगळ्या देशात. कोरोना व्हायरस मुळे अमेरिकेचा चीनबाबत खूप असंतोष निर्माण झालेला आहे. जर अमेरिकेत टिकटॉक बंद पडलं तर चिंगारी तिथं ही उभारी घेऊ शकतं. अमेरिकेच्या निर्णयावर आता चिंगारी ऐपचं जागतिक भवितव्य अवलंबून आहे.

Leave a Comment