फत्तेशिकस्त चित्रपटातील अभिनेत्री मृण्मयी चा हा आवडता सिम . पहा कोणता सीन आहे तो

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही अष्टपैलू आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. तिच्या अभिनय कौशल्याने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. २०१९ मध्ये फत्तेशिकस्त या चित्रपटात ती केसर या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या भूमिकेसाठी तिने प्रचंड मेहनत घेतली, शिवकालीन भाषा आणि तलवार बाजीचं प्रशिक्षण देखील घेतलं. फत्तेशिकस्त मधली ही केसर आता झी टॉकीजवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. १६ ऑगस्टला या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवर होणार आहे.

या चित्रपटातील आवडत्या प्रसंगाबद्दल विचारलं असताना मृण्मयी म्हणाली, “या चित्रपटातील एक सीन माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. जेव्हा केसर पकडली जाईल कि काय अशी भीती निर्माण होते आणि भटारखान्यात नामदारखान जेव्हा केसरचा गळा धरतो तेव्हा मला वेग वेगळे हावभाव एकाच वेळेस दयायचे होते. हा अवघड सीन आम्ही शूट केला आणि तो पहिल्याच टेक मध्ये व्यवस्थित शूट झाला. दिग्पाल आणि माझा अत्यंत आवडीचा हा प्रसंग होता. चित्रपट रिलीज झाल्यानंतर बहिर्जी नाईक आणि केसर यांच्या भूमिका विशेष लक्षात राहिल्या असं बऱ्याच लोकांकडून सांगण्यात आलं आणि माझ्या आवडत्या सीनचं कौतुक खूप लोकांनी केलं.”

See also  सावधान! कोरोना महामारीला षडयंत्र म्हणाल तर होऊ शकते अटक, दिल्लीत एका डॉक्टरवर गुन्हा दाखल

या प्रसंगात नक्की काय घडलं हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका फत्तेशिकस्त रविवार १६ ऑगस्ट दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त झी टॉकीजवर

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment