म्हणूनच उद्धव ठाकरेंनी पाहिले असावे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

राजकारणात परिस्थिती सतत बदलत असते. समोर आलेल्या परिस्थितीला एखादा राजकारणी कसे स्वीकारतो, यावर त्याचे भविष्य ठरत असते. सध्या राजकारण हा बेभरवशाचा प्रांत झाला असल्याने कुणावर किती विश्वास टाकायचा हा प्रश्न असतो.

uddhav swearing in amey

एक काळ होता जेव्हा बाळ ठाकरे मातोश्रीवर बसवून मंत्री बदलायचे. ‘रिमोट कंट्रोल राजकारण’ हा शब्द महाराष्ट्राला बाळासाहेबांमुळे माहिती झाला असला तरी देशाला तो पूर्वीच महात्मा गांधींच्या रूपाने माहिती होता. फरक एकच होता की, ऐन जोशात असतानाही शिवसेनेला परिणामी बाळासाहेबांना एकहाती सत्ता मिळाली नाही. आणि शेवटच्या काळात महात्मा गांधींनाही रिमोट कंट्रोल राजकारण तोट्याचे असते, हे लक्षात आलं.

2010 आणि दरम्यान बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेना टिकणार नाही, अशा चर्चा लोकांमध्ये होऊ लागल्या. उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळणे किंवा राजकारण करणे जमणार नाही, याही चर्चा अगदी सामान्य माणसात होऊ लागल्या.

See also  "दोन मुलांना जन्म देऊन थकले मी आता" करीना कपूरने दुःखी मनाने व्यक्त केल्या आपल्या भावना...

uddhav cm 660 281119084317

2020 मध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. कधीच राजकिय पद न स्वीकारणारे ठाकरे परिवारातील उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा राजकिय मैदानात उतरले. यात विशेष बाब ही आहे की, उद्धव ठाकरेंनी बदलत्या राजकारणाची पावले ओळखली आहेत.

बाळासाहेबांच्या शेवटच्या टप्प्यात रिमोट कंट्रोल राजकारणाचाही शेवट दिसत होता. कारण जेव्हा जेव्हा शिवसेनेकडे सत्ता आली किंवा जेव्हा शिवसेनेचा बरा काळ होता, तेव्हा शिवसेना मोठ्या प्रमाणात वाढली नाही. याचं सर्वात महत्वाचं कारण उद्धव ठाकरेंनी ओळखले आणि म्हणूनच त्यांनी आधी मुलाला म्हणजे आदित्य ठाकरेंना आमदारकीला उभा केले. तसेच मोठी अटीतटीची राजकीय चाल खेळत स्वतःही मुख्यमंत्री झाले.

29uddhav3

राज आणि उद्धव ठाकरेंचे राजकीय यश मोजायचे झाल्यास उद्धव उजवे ठरतात. कारण राज अजूनही ग्राऊंडवर उतरलेले नाहीत.

एका ठराविक काळानंतर बदल हा प्रत्येक क्षेत्रात होत असतो. जवळपास एक मोठा काळ गाजवणारा गोविंदा सारखा सुपरस्टार, कॉमेडीस्टार आज बॉलीवूडपासून बाजूला पडलेला आहे. तर अमिताभ अजूनही सिनेमात काम करतो आहे. कारण सिनेमात झालेले बदल अमिताभ यांनी स्वीकारले. गोविंदा मात्र या क्षेत्रात नव्याने झालेले बदल स्वीकारू शकला नाही.

See also  या बॉलिवूड अभिनेत्री अजूनही केले नाही लग्न, एक तर म्हणते मला माझ्या मनासारखा नवरा भेटाना...

1574956100 7696

सेनापती निवांत झोपा काढत असेल आणि सैनिक मैदानावर लढत असतील तर सैनिक एकदा जिंकतील, दोनदा जिंकतील मात्र सारखे जिंकू शकत नाहीत. म्हणूनच युद्धात सर्वात पुढे सेनापती असतो आणि सैनिक मागे असतात. हीच गोष्ट उद्धव ठाकरेंनी उशिरा का होईना लक्षात घेतली.

काँग्रेसचा पराभव होण्यास काँग्रेसचे हायकमांडही तितकेच कारणीभूत आहे. मध्यंतरीच्या काळात काँग्रेसही रिमोट कंट्रोल राजकारण करत होती. 2014 च्या लोकसत्तात म्हटले होते की, रीमोट कंट्रोलचे राजकारण करणाऱ्या नेत्यांचा इतिहास हेच दाखवतो की, काही प्रमाणात गांधी यांचा अपवाद वगळता अन्य प्रत्येकास रणमैदानात उतरावे लागले. मग ते पंडित जवाहरलाल नेहरू असोत राम मनोहर लोहिया असो वा श्यामा प्रकाश मुखर्जी असोत. अलीकडच्या काळातील एम. जी. रामचंद्रन, एन. टी. रामा राव.

See also  राजे-महाराजांच्या घराण्यातील आहेत या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, ही अभिनेत्री तर...

72282153

प्रत्येकाने राजकारणाच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत भाग घेतला आणि मगच आपल्या हाती रिमोट राहील याची खबरदारी घेतली. उद्धव ठाकरे यांनाही या बदलत्या राजकारणाची जाणीव झाली असावी आणि वयाच्या पन्नाशी ओलांडल्यानंतर त्यांनीही थेट राजकारणात उतरत मुख्यमंत्री पदाचा झेंडा हाती घेतला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Ram

Ram

Leave a Comment