महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? वाचा मुख्यमंत्र्यांनी काय दिलं उत्तर

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मुंबई: आज पावसाळी अधिवेशनाचा दूसरा आणि शेवटचा दिवस होता. आजच्या अनेक विधेयक मंजूर करण्यात आली. आजचे कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इतर मंत्र्यांसोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 2 दिवसात झालेल्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. तसेच पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर दिले.

पत्रकार परिषदेवेळी एका पत्रकाराने उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीवरुन एक प्रश्न विचारला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामुळे अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांना हसू अनावर झाले. मागील महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यांच्या सोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.

See also  अभिमानास्पद! नीरज चोप्राने रचला इतिहास, ऑलंपिकमध्ये १३ वर्षांनंतर भारताला मिळवून दिलं सुवर्णपदक...
Advertisement

मात्र, यानंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान सुमारे 30 मिनिटे वैयक्तिक चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर राज्यात काही राजकीय भूकंप होणार आहे का ? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले की, “तीस वर्ष सोबत असूनही भाजपसोबत काही घडलं नाही, मग आता काय घडेल?” यावेळी उपस्थित सर्वांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य झळकले.

मुख्यमंत्र्यांनी केली देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

Advertisement

काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप आमदारांनी केलेल्या राड्यावर पहिल्यांदाच मुख्यंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले काल जे भाजप आमदारांनी केलं, ते महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल असे कृत्य आहे. आपल्या राज्याच्या संस्कृतीला लाजविणारं ते कृत्य होतं.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “विधानसभा सभागृह हे काही सरकार आणि विरोधकांमध्ये कुस्ती खेळण्याचा आखाडा नसून ते लोकशाहीचे एक पवित्र मंदिर आहे. राजकीय मतभेद असतात. मात्र, लोकशाहीचे मूल्य जोपासत विरोध दर्शवणे गरजेचे आहे. कालचं चित्र शरमेने मान खाली घालणारं होतं. सभागृहात राडा आणि आरडाओरड कराची काहीच गरज नव्हती, माईक उपलब्ध असताना बेंबीच्या देठापासून जोरजोरात ओरडणे चूक आहे.”

See also  महाराष्ट्रातील छत्रपतींचे हे दुसरे मंदिर तुम्हाला माहित आहे का ?
Advertisement

Leave a Comment

close