आता कोरोनाच्या निशाण्यावर लहान मुलं, ‘या’ ठिकाणी झाला एकाच आठवड्यात 100 पेक्षा जास्त निष्पाप मुलांचा मृत्यू
तज्ञांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या तिसर्या लाटेबाबत चेतावणी दिली आहे. कोरोना संदर्भात सुरक्षात्मक उपाय अवलंबण्याची गरज असल्याचे तज्ञांचे अत आहे. तसेच तिसर्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे वारंवार सांगितल्या जात आहे. तिसर्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याची सूचना खरी होताना दिसत असून, इंडोंनेशियामध्ये कोरोनामुळे शेकडो मुलांना आपला जीव गमवावा लागला. केवळ एका आठवड्यात 100 पेक्षा जास्त निष्पाप मुलांना आपला जीव गमावला.
तिसरी लाट शिगेला…
इंडोनेशियात या महिन्यात एका आठवड्यात 100 हून अधिक मृत्यू झाले. सध्या इंडोनेशियात कोरोना संसर्ग शिगेला आहे. येथे कोरोनाने आता लहान मुलांना विळख्यात घेणे सुरू केले असून, दिवसेंदिवस लहान मुलांत संसर्ग वाढत आहे. देशातील एकूण कोरोनाबधितांपैकी सुमारे 12.5% लहान मुले आहेत. मागील महिन्यापेक्षा हा आकडा जास्त असून, एकट्या 12 जुलैच्या आठवड्यात 150 पेक्षा जास्त मुलं कोरोनामुळे मरण पावली, त्यातील जवळजवळ निम्मी मुले 5 वर्षांखालील वयोगटातील आहेत.
18 वर्षाखालील 800 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू…
कोरोना महामारीची सुरूवात झाल्यापासून इंडोनेशियात 18 वर्षाखालील 800 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाला. परंतु यातील बहुतांश मृत्यू गेल्या महिन्यात झाले आहेत. येथील रुग्णालये क्षमतेपेक्षा जास्त भरली असून, लहान मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची व्यवस्था करण्यात येत आहे.
इंडोंनेशियामधील कोरोनाची तिसरी लाट पहिल्या दोन्ही लाटेपेक्षा धोकादायक ठरत आहे. त्यामुळे भारतीयांनी सुद्धा याबाबत खबरदारी घेणे जरूरी आहे. भारतात कोरोनाची संभावित तिसरी लाट सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान येणार असल्याच्या सूचना तज्ञांनी दिल्या आहेत. सरकारही तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी करत आहे. मात्र, जनतेने सुद्धा कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.