बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये पसरला कोरोना, करीना कपूरसह अमृताच्या बिल्डिंग मध्ये होणार टेस्टिंग कॅम्प, BMC करणार सॅनिटायजर
देशभरात कोरोनाने धूमाकळ घातला आहे. त्यामुळे सर्वत्र कोरोना पासून वाचण्यासाठी अनेक नियम पाळले जात आहेत. आतातर बॉलीवुडच्या मायानगरीत सुद्धा कोरोनाने हाहाकार माजवला आहे. बॉलीवुड अभिनेत्री करीना कपूर आणि तिची बेस्ट फ्रेंड अमृता अरोरा यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता बीएमसीने सर्वांत मोठे पाऊल उचलले आहे. आज मंगळवारी करीना आणि अमृता अरोरा या दोघींच्याही बिल्डिंग मध्ये बीएमसी कडून कोविङ टेस्टिंग कॅम्प लावण्यात आले आहे.
बीएमसीचे दोन्ही पथक करीना व अमृता यांच्या बिल्डिंग मध्ये आरटी पीसीआर चाचणी करणार आहे. बीएमसीची संपूर्ण टीम करीना आणि अमृता यांच्या बिल्डिंग कंपाऊंड आणि इतर सर्व परिसरात सुद्धा सॅनिटायजेशन करणार आहे. त्याचप्रमाणे इंडस्ट्रीमधील चित्रपट निर्माते करण जोहर याचे घरही सॅनिटायजर करेल. कारण ही पार्टी करणच्या घरी झाली होती. तेथूनच कोरोनाचा संसर्ग सुरू झाला.
अभिनेत्री करीना कपूर ही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यावर आता ती होम आयसोलेशन मध्ये आहे. बीएमसी टीम दररोज या अभिनेत्रींच्या प्रकृतीचे अपडेट घेत राहील. करीना आणि अमृता अरोरा याशिवाय महीप कपूर आणि सीमा खान यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कारण हे चौघेही एकमेकांच्या संपर्कात आले होते. हे चौघेही एकाच गर्ल गँग मध्ये एकत्र आले होते. यामध्ये गेटटूगेदर पार्टी होती. बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाल्यावर बीएमसी याविषयी खूप सावध झाली आहे. करीना कपूरच्या वतीने सोमवारी सांगण्यात आले की, ती आता बरी होत आहे.
मीडियाच्या माहितीनुसार, सर्वांत पहिल्यांदा सीमा खानला कोरोनाची लागण झाली होती. 8 ङिसेंबरला करण जोहरच्या घरी गेटटूगेदर पार्टी झाली होती. या पार्टीत करीना कपूर खान, अमृता अरोरा या उपस्थित होत्या. “कभी खुशी कभी गम” या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. 11 ङिसेंबर रोजी सीमा खानचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर करीना खान आणि अमृता अरोरा यांचीही कोरोना चाचणी झाली, यामध्ये त्या पॉझिटिव्ह निघाल्या. इतकंच नव्हे तर करीना कपूर आणि अमृता अरोरा व रिया कपूर यांच्या घरी सुद्धा एकत्र आल्या होत्या. तेथे करिश्मा कपूर, मलाइका अरोरा आणि मसाबा गुप्ता ह्या सुद्धा उपस्थित होत्या.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.