रोहित शर्माने आपले लोणावळ्यातील घर अशोक सराफांच्या कुटुंबीयांना विकले तब्बल इतक्या कोटींना…
आपल्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गङी राखून पराभव करत विजेतेपद पटकाविले. तर चौथ्या ङावात भारताने दिलेले 139 धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने 8 गङी राखून अगदी सहजपणे पार केले. या सामन्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.
या इंग्लंड संघासोबतच्या कसोटी मालिकेसाठी खूप काळ शिल्लक असल्याने भारतीय संघ हा आता एकूण तीन आठवड्यांच्या सुट्टीवर जाईल. 4 ऑगस्टपासून भारत व इंग्लंड यांच्यामधील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधी तीन आठवड्यांचा आराम घेऊन खेळाडू 14 जूलै रोजी सरावासाठी पुन्हा एकत्र येतील.
या सुट्टीत खेळाडू आपल्या कुटुंबियांसह इंग्लंड मध्ये मनसोक्त भटकंती करताना दिसत आहे. या सुट्टीचा आपला लाडका खेळाडू रोहित शर्मा हा सुद्धा जबरदस्त आनंद घेताना दिसत आहे. यादरम्यान रोहित शर्मा ह्याच्या बाबत एक खूप मोठी बातमी समोर आली आहे.
तुम्हांला ठाऊक आहे का, रोहित शर्मा ह्याने आपले महाराष्ट्रातील लोणावळा मधील घर विकले आहे. तब्बल 6 हजार 259 स्क्वेअर फिटचे घर रोहितने 5 कोटी 25 लाखांना विकले आहे. आपल्या हिटमॅनचा बंगला हा कुणी विकत घेतला असावा बरं, याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
तर मित्रांनो हा आलिशान बंगला सुषमा अशोक सराफ यांनी विकत घेतला आहे, असे समोर आले आहे. परंतु रोहीत शर्मा ह्याने आपला बंगला का बरं विकला, हे मात्र अद्यापही समोर आलेले नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.