“हा” प्रसिद्ध मराठी अभिनेता साकारतोय ‘दख्खनचा राजा ज्योतिबाची’ भूमिका, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

Advertisement

को’रो’ना काळात काळजी घेऊन चित्रीकरण करायला सरकारने परवानगी दिल्याने अनेक चॅनेल ने नवनवीन मालिका निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. त्यात सध्या एक मालिका फार चर्चेत आहे. ती भक्तिमय मालिका असणार आहे. त्या मालिकेचा प्रोमो ही खूप प्रेक्षकांना पसंतीस पडत आहे.

त्या मालिकेचं नाव आहे दखनचा राजा ज्योतिबा. खूप वेगळी मालिका लवरकच प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. पण त्यात प्रमुख भूमिका ज्योतिबा ची नेमकं कोण साकारत आहे ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

Advertisement

त्यामधील प्रमुख भूमिका, अर्थात ज्योतिबा कोण साकारणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. तेच जाणून घेणार की कोण साकारत आहे. आणि त्यासोबत मालिका निर्मिती चा इतिहास ही.

ज्योतिबाचं माहात्म्य सांगणारी एक नवी मालिका छोट्या पडद्यावर सुरू होत आहे. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत मध्यवर्ती भूमिका, अर्थात ज्योतिबा कोण साकारणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. मालिकेतला ज्योतिबाचा लुक ‘मुंटा’ तुमच्यासमोर घेऊन येत आहे. नवोदित अभिनेता विशाल निकम ज्योतिबाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी तो ‘सात जलमाच्या गाठी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला होता.

See also  "येऊ कशी तशी मी नांदायला" मधली नलू मावशी खऱ्या आयुष्यात आहे खूपच मॉडर्न, पहा तिचे सुंदर फोटो...
Advertisement

vishal nikam

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेची निर्मिती कोठारे व्हिजन्स, अर्थात ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते महेश कोठारेकरत आहेत. खास बाब म्हणजे ज्योतिबाचं देवस्थान असलेल्या कोल्हापूर नगरीतच मालिकेचं संपूर्ण चित्रीकरण होणार आहे.

Advertisement

कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचा भव्यदिव्य सेट आकाराला येत असून, लवकरच मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा होणार आहे. या मालिकेच्या निमित्तानं कोल्हापुरातील तंत्रज्ञ आणि कामगारांना लॉकडाउननंतर कामाची नवी संधी मिळाली आहे.

मालिकेविषयी महेश कोठारे सांगतात की, ‘दख्खनचा राजा ज्योतिबा ही मालिका म्हणजे ज्योतिबाची कथा आहे. ज्योतिबा हे पश्चिम महाराष्ट्राचं आराध्यदैवत आहे. अंबाबाईच्या हाकेला धावून आलेला हा देव ज्याने रत्नासूर, कोल्हासुर आणि औंधासुराचा वध केला.

Advertisement

कोल्हासुराचा व’ध झाल्यानं त्या परिसराला कोल्हापूर असं नाव पडलं. या कथा आपण पुराणात वाचल्या असल्या, तरी पहिल्यांदाच मालिकेच्या रुपात त्या पाहायला मिळणार आहेत. पौराणिक मालिका साकारणं हे फार आव्हानात्मक असतं. एक तर हिंदीच्या तुलनेत मराठीमध्ये बजेटची मर्यादा असते.

See also  या प्रसिद्ध मराठी संगीत दिग्दर्शकाचं झालं नि'ध'न, संपूर्ण मराठी सिनेसृष्टी शो'का'कु'ल...

तरीही मालिकेची भव्यता कमी होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. व्हीएफएक्स उत्तम प्रकारे दिसणं महत्त्वाचं असतं. या मालिकेसाठी कोल्हापुरात भव्यदिव्य सेट उभा करण्यात आलाय. जवळपास दीड महिन्यापासून सेटचं काम सुरू आहे. कोल्हापुरात असा भव्य सेट उभारणं हेदेखील आव्हान होतं.

Advertisement

कलादिग्दर्शक संतोष फुटाणे आणि संपूर्ण टीम सेट उभारण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. यामध्ये ज्योतिबाचा महाल, महालक्ष्मीचा महाल, गाव, आश्रम, क्रोमा फ्लोअर यांचा समावेश आहे.’

सध्या प्रेक्षकांना या मालिकेत खूप काही वेगळं पाहायला मिळणार आहे. ज्योतिबाच्या कथा अनुभवायला मिळणार आहेत. तर ज्योतिबा च्या मालिकेची आम्ही दिलेली सविस्तर माहिती आपल्याला कशी वाटली ती नक्की कळवा.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा उरकला नुकताच साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री...
Advertisement

One thought on ““हा” प्रसिद्ध मराठी अभिनेता साकारतोय ‘दख्खनचा राजा ज्योतिबाची’ भूमिका, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

  1. I am residing at Greater Mumbai since my birth. Well, we maharashtrian especially west maharashtrian eagerly waiting for such kind of serial . Thank you Mr.Kothare sir and production house team for serial success. Do not bother about TRP this is going to be rock . Our best wishes. In near future can we expect serial on weekend rather than a weekend.

    Thank you .

Leave a Comment

close