अतिवृष्टीमुळे राज्यातील रस्त्यांचे शेकडो कोटींचे नुकसान, आकडा ऐकून धक्का बसेल; अशोक चव्हाण यांनी दिली माहिती

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मुंबई: राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नंतर उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे मोठी जीवित आणि वित्त हानी झाली आहे. काही भागात दरडी कोसळून देखील मोठे नुकसान झाले. या सर्व घटनांमुळे राज्यातील रस्त्यांचे सुमारे 1.8 हजार कोटी म्हणजे तब्बल 1800 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

सर्वाधिक नुकसान कोकणचे…

राज्यातील सर्वच विभागात अतिवृष्टी, पुर आणि भुसखलनामुळे रस्ते आणि पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सर्वाधिक नुकसान कोकणामध्ये झाले आहे. कोकणमध्ये सुमारे 700 कोटी रुपयांचे झाले असल्याचा अंदाज आहे.  त्याखालोखाल पुणे विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नागपुर विभाग व नाशिक विभाग आहेत.  सर्वाधिक नुकसान झालेल्या कोकण आणि पश्चिम महाराष्टतील जिल्ह्यातील हानीची पाहणी करण्याकरिता जिल्हानिहाय मुख्य अभियंत्याची आणि समकक्ष दर्जाच्या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

See also  कसे काय हा दगड हजारो वर्षांपासून एका डोंगरावर अडकला आहे? कारण ऐकून थक्क व्हाल!

नुकसानीचा अंदाज छायाचित्र आणि ड्रोन चित्रीकरणाच्या माध्यमातून….

अजूनही काही ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि काही ठिकाणी दरडी साफ करण्याचे काम सुरू आहे. सर्व ठिकाणी झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी टीमला जाण्यास अडचण येत असल्यामुळे छायाचित्रे आणि ड्रोन चित्रीकरणाच्या माध्यमातून प्राथमिक नुकसानाचा अंदाज लावण्यात आला आहे. अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

“प्राथमिक अंदाजानुसार 290 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. 469 रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती, तर 140 पूल व मोऱ्या पाण्याखाली गेले होते. अंतिम पाहणी अहवालात नुकसानाच्या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या मंगळवारी 3 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाची मुंबईत बैठक होणार आहे. त्यावेळीही राज्यातील परिस्थितीचा पुनःश्च आढावा घेतला जाईल. दरम्यान, राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या नुकसानीबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली,” असंही चव्हाण यांनी नमूद केलं.

See also  ऑनलाइन मैत्री ठरू शकते धोकादायक; बर्थडे पार्टीसाठी 5 स्टार हॉटेल मध्ये बोलावून महिलेसोबत केले असे काही, ऐकून धक्का बसेल
Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment