“दमलेल्या बाबाची कहाणी” चित्रपटातील ही बाल कलाकार आता दिसते अशी, पहा तिचे सुंदर फोटो…
बाप आणि मुलीच्या नात्यावर काही वर्षांपूर्वी एक गाणं आलं होतं. जे इतकं व्हायरल आणि पसंत केलं होतं की कुणीही ते ऐकलं की भावुक व्हायचा. त्या गाण्याचं नाव होतं दमलेल्या बाबाची कहाणी. आजही गाणं गुणगुणत राहिलं तरी खूप भारी वाटतं. त्यात बाल कलाकार म्हणून जिने काम केलं तिची निरागसता ही गाण्याचं खरं यश आहे.
तर ती त्यावेळी लहान होती. पण आता ती कशी दिसत असेल बरं ? म्हणजे सोशल मीडियावर ती सतत कार्यरत असते. त्यामुळे चला तर मग जाणून घेऊ सविस्तर.
दमलेल्या बाबाची कहाणी’ ( damlelya babachi kahani ) हा सिनेमा २०१६ साली प्रदर्शित झाला होता. सिनेमाने देखील रसिकांची प्रचंड पसंती मिळवली होती. हा सिनेमा रसिकांना भावला आणि सिनेमातील कलाकारांना तसंच त्यांच्या भूमिकांना रसिकांनी डोक्यावर घेतलं.
समाजाच्या ह्या मानसिकते विरुद्ध, एका मुलीचा हळुवार मनाचा बाबा कसं तोंड देतो आणि हे करत असतांनाच, आपलं आणि आपल्या मुलीमधील हळुवार नातंही तो कसं जपत असतो हे अतिशय सुंदररित्या सिनेमातून रसिकांना पाहायला मिळाले होते. कारण बाप आणि मुलीचं नातं हे खूप नाजूक असतं. हळवं असतं. आणि म्हणून ते गाणं खूप भावलं.
आता सगळ्यात आधी ते गाणं गाजलं. मग गाण्यावर सिनेमा बनवण्याचं ठरलं. म्हणजे बघा सिनेमावर गाणे बनतात; पण गाण्यावर सिनेमा हे मराठी त कदाचित पहिल्यांदाच घडत होतं.
दमलेल्या बाबाची कहाणी गाणेही प्रचंड गाजले होते. गाण्यावरून सिनेमा बनलवण्याची कल्पना साकारण्यात आली होती. संदीप खरे, दीप्ती भागवत ( dipti bhagvat ) ह्यांसोबत बालकलाकार श्रेया पासलकर ( shreya pasalkar ) अभिनयाने रसिकांची मनं जिंकली होती. सिनेमात संदीपने ( sandip khare ) साकारलेला दमलेला बाबा आणि मुलीचा अभिनय इतका सुंदर झाला होता की, बाबा आणि मुलीमधील नात्याचं वास्तववादी चित्रण सिनेमात पाहायला मिळाले होते.
आणि कसं असतं सिनेमा वास्तववादी झाला तरच तो आपला वाटतो. आसपासचा वाटतो. तर हा सिनेमा खरच खूप लोकप्रिय झाला गाण्यासारखाच.
बालकलाकार श्रेयाने साकारलेल्या भूमिकेनेही रसिकांची विशेष पसंती मिळवली होती. अतुल कुलकर्णी यांच्यासोबतही जाहीरातीमध्ये ती झळकली होती. श्रेया आता फार मोठी झाली आहे. काळानुसार तिच्या लूकमध्येही प्रचंड बदल झाला आहे. या सिनेमामुळे श्रेयाला नवी ओळख आणि लोकप्रियता लाभली.
तिने लहानपणी केलेलं काम आता तिच्या फायद्यात येत आहे. कारण तिला तीच ती खरी ओळख आहे. त्यामुळे इथून पुढे इंडस्ट्रीत काम जर करायचं असेल तर तिला सोपं होईल.
मात्र आता हीच श्रेया करते काय?, ती कशी दिसते असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तिचा लूक पाहून तुम्ही तिला ओळखणारही नाही.अभिनयसोबातच श्रेयाला गायनाचीही प्रचंड आवड आहे. तिने गायनाचे अनेक स्टेज शोज देखील केले आहेत.
श्रेया अभिनय करते, गायन करते त्यासोबत शिक्षण ही. ती एक उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे. तिच्या वयासोबत ज्ञान ही वाढो हीच स्टार मराठी कडून पुढील यशस्वी भावी वाटचाली करीता शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.