“दंगल” फेम या अभिनेत्रीने घेतलं एवढ्या कोटींचे घर, किंमत ऐकून हैराण व्हाल!
अनेक जन मायानगरी मुंबई मध्ये सुप्रसिद्ध कलाकार होण्याचं स्वप्न उशाशी घेऊन येतात. कष्ट करतात. काहींना यश मिळतं तर काहींना मिळत नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीत असेच आजवर अनेक अभिनेते अभिनेत्री या मुंबई मध्ये आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने आल्या. आणि त्यातील काही सुपरस्टार झाल्या. त्यातलीच एक सान्या मल्होत्रा. होय ! दंगल गर्ल सान्या ने 5 ते 6 वर्षांपूर्वी मुंबई गाठली होती. अभिनयात करियर करण्यासाठी.
आणि अखेर तिने दंगल सिनेमात अमीर खान सोबत भूमिका करून चांगलेच नाव कमावलं होतं. दंगल हा सिनेमा लोकप्रिय झालेला होता. त्यामुळे तिला नाव आणि पैसा हा कधीच कमी पडला नाही. पुढे बधाई हो, लुडो या सिनेमात केलेल्या सुद्धा तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.
ती सोशल मीडियावर ही चांगलीच कार्यरत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील चांगलेच व्हायरल होत असतात. आज सान्या चे लाखो चाहते आहेत. ज्यांचं प्रेम तिला कायम लाभतं. सुरुवातीला ती मुंबई मध्ये सिंगल बेड फ्लॅट मध्ये राहायची.
कारण ती तेव्हा एकटी होती. तिचे कुटुंब दिल्लीत राहायचे. पण आता तिने घर घेतलं आहे. कारण तिला कुटुंबातील सर्वांसोबत राहता येईल. सान्या म्हणते, ” मुंबई आता माझ्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनलेला आहे. मुंबई ने मला खूप काही दिलेलं आहे. त्यामुळे आता सर्वांच्या सोबत इथं आनंदाने राहायचं आहे.
म्हणून हे घर घेतलेलं आहे. वर्सोव्हा लिंक रोड दरम्यान असलेल्या एका अलिशान अपार्टमेंट मध्ये तिने घर घेतलेलं आहे. त्याची स्टॅम्प ड्युटी ही 73 लाख आणि काहीतरी हजार अशी भरलेली आहे. आणि एकूण घराची किंमत तर प्रचंड आहे. 14 कोटी रुपयांना तिने तिथे फ्लॅट घेतलेला आहे. दिवाळीच्या ऐन मुहूर्तावर हे तिच्या आयुष्यात खूप आनंददायी घडत आहे. आता ती अभिनेता हृतिक रोशन ची पडोसी बनलेली आहे. कारण हृतिक रोशन यांनी इथे दोन मोठे 100 कोटींचे फ्लॅट खरेदी केले आहे.