अवघ्या 14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षी 2 मुलांची आई; तरी मेहनतीने असं साकार केलं IPS होण्याचं स्वप्न!
मनामध्ये यशस्वी होण्याचं सशक्त ध्येय पाहिजे. त्या ध्येयाला योग्यरित्या खतपाणी घातलं पाहिजे. जर अपार कष्ट आणि मेहनत केली तर यश मिळतं. ही जगण्याची किंवा यशाची व्याख्याचा आहे. एका महिला अधिकाऱ्यानं हे सिद्ध करून दाखवलं आहे. चला जाणून घेऊयात त्यांची यशोगाथा.
तामिळनाडूच्या रहिवासी एन. अंबिका (N. Ambika ) या अपार कष्ट, मेहनत करून आज आयपीएस अधिकारी झालेल्या आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात पहिले पोस्टिंग मिळाले आणि आता त्या मुंबईच्या लेडी सिंघम म्हणून ओळखली जातात. कारण त्यांचं काम खूप धडाकेबाज आहे. गुन्हेगारी वर आळा आणणारं आहे.
14 वर्षी लग्न आणि 18 वर्षांच्या वयात 2 मुलांची आई…त्यांनतर हा यशस्वी प्रवास सोपा नव्हता. तामिळनाडूच्या रहिवासी असलेल्या संघर्षाची खडतर वाट तुडवून यश पदरी पाडणाऱ्या एन. अंबिका यांचे वयाच्या 14 व्या वर्षी दिंडिकाळ येथील पोलीस कॉन्स्टेबलशी लग्न झाले होते. आणि पुढे त्या 18 वर्षांच्या होईपर्यंत दोन मुलांची आई झाल्या होत्या. त्यात आई होणं ही सोपं काम नाही. सगळं काही सांभाळून घ्यावं लागतं.
एन अंबिका या घरची, मुलांची काळजी घेण्यात प्रचंड व्यस्त झाल्या होत्या. पण याच दरम्यानच्या काळात त्यांच्या मनात यूपीएससी तयारी करून, यशस्वी होऊन आयपीएस होण्याचा विचार आला. मग काय दृढ निश्चय केला.
आयपीएस बनण्याचा विचार कसा, कधी व का आला ? इंडिया टाइम्सच्या अहवालानुसार, एन. अंबिका एकदा कॉन्स्टेबल पतीसह प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारी पोलिस परेड पाहण्यासाठी गेल्या होत्या, जिथं त्यांनी त्यांच्या पतीला मोठमोठ्या पोलिस अधिकाऱ्यांना सलाम करताना पाहिले आणि तेव्हाच मनी पक्के केले ? की जर मी एवढी मोठी अधिकारी झाली तर ? मला हा सन्मान कसा मिळेल ? जेव्हा अंबिका यांनी पतीशी याबद्दल सांगितले तेव्हा ते म्हणाले, ” हा सन्मान मिळवणे इतके सोपे नाही. त्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत. जीवतोड मेहतन. अभ्यास करावा लागतो.मग काय अखेर यूपीएससीची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर अंबिका यांनी नागरी सेवांची प्रवेश परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
यूपीएससीची माहिती मिळाल्यानंतर एन. अंबिका यांनी जोमानं अभ्यास सुरू केला आणि प्रथम दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. बारावीनंतर त्यांनी दूरस्थ शिक्षणातून पदवी घेतली. पुढे त्या हळूहळू आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करण्यास सक्षम झाल्या. यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
पतीने पाठिंबा दिला. जो खूप मोलाचा ठरला. एन. अंबिका आणि त्यांचे कुटुंब एका छोट्या शहरात राहत होते, ज्यात शिक्षणाची पुरेशी सोय नव्हती. मग अंबिका यांच्या पोलिस कॉन्स्टेबल पतीने पत्नीची चेन्नईमध्ये राहण्याची तसेच शिकण्याची व्यवस्था केली. पतीने पत्नीच्या अभ्यासाला पूर्ण पाठिंबा दिला आणि नोकरीबरोबरच मुलांची काळजी घेण्यास सुरुवात केली.
तीन अपयशानंतर पती म्हणाला परत माघारी ये. चेन्नईमध्ये राहत असताना एन. अंबिका यांनी कठोर परिश्रम केले आणि यूपीएससी परीक्षेसाठी खूप तयारी केली. मात्र, असे असूनही त्या सलग तीन वेळा अपयशी ठरल्या. जेव्हा अंबिका या तिसऱ्यांदा उत्तीर्ण झाल्या नाहीत, तेव्हा पतीने परत येण्यास सांगितले, परंतु त्यांनी शेवटच्या वेळी प्रयत्न करण्याचा आग्रह धरला. अखेर पतीने सहमती दर्शविली.
चौथ्या प्रयत्नात बनल्या आयपीएस अधिकारी एन. अंबिका यांनी अखेर चौथ्या प्रयत्नात आपली सर्व शक्ती एकजुटीने प्रचंड अभ्यास केला. खूप मेहनत केली आणि वर्ष 2008 मध्ये यूपीएससीची कठीण परीक्षा उत्तीर्ण केली.
यानंतर त्यांचे आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात पहिली पोस्टिंग मिळाली. यश कधीच सहजासहजी मिळत नसतं. यशाला संघर्षमय, काटेरी खडतर रस्त्यावरून प्रवास करत मिळवावे लागतं.