‘दे ध’क्का’ मधील सायली आता दिसतेय अशी, तिचे नवीन फोटो पाहून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

कलाजगत हे खूप ग्लॅमरस आहे. इथे लहानपणी जर एखाद्या अभिनेत्री ने बाल कलाकार म्हणून काम केलेले असलं तर तिला मोठेपनी पाहायला अनेक चाहते उत्सुक असतात. तर सध्या दे ध’क्का आणि इतर काही चित्रपट मध्ये काम केलेल्या बाल कलाकार कशी दिसते हेही आपल्याला जाणून घेण्याची नक्कीच उत्सुकता असले तर चला मग जाणून घेऊयात.

रुपेरी पडद्यावर २००८ साली सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे ‘दे ध’क्का’. हा चित्रपट रसिकांना भावला आणि चित्रपटातील कलाकारांना तसंच त्यांच्या भूमिकांना रसिकांनी डो’क्या’व’र घेतलं. सिद्धार्थ जाधवचा अतरंगी अंदाज आणि त्याला मकरंद अनासपुरेचा गावरान बाज रसिकांना भावला.

याशिवाय शिवाजी साटम, मेधा मांजरेकर यांच्याही या चित्रपटात भूमिका होत्या. ‘दे ध’क्का’ या चित्रपटात दोन बालकलाकरांनी त्यांच्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली होती. ते बालकलाकार म्हणजे सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य. मात्र आता हे बालकलाकार मोठे झालेत आणि त्यामुळे त्यांचा लूकही. गौरीने दे धक्का चित्रपटात सायली ही भूमिका साकारली होती.

See also  ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, 93 व्या वर्षी घेतला त्यांनी अखेरचा श्वास

तिची भूमिका खूप गाजली होती. तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. बालपणी सुद्धा अनेकांचे प्रेम मिळवणारी एकमेव कलाकार असेल. तर तिचं काम आता मोठेपणी कसं दिसणार आहे हेही आता जाणून घेऊयात.

De Dhakka Ugavali Shukrachi Chandani

‘दे ध’क्का’ चित्रपटाची कथा जिच्या डान्स स्पर्धेभोवती फिरत होती ती भूमिका गौरीने साकारली. तिच्यावर चित्रीत झालेलं ”उगवली शुक्राची चांदणी” हे गाणं हिट ठरलं होतं. या चित्रपटातील याच गाण्यामुळे गौरीला नवी ओळख आणि लोकप्रियता लाभली. मात्र आता गौरीला पाहून तुम्ही तिला ओळखणारही नाही.

गौरी आता २५ वर्षांची झाली आहे. तिने मुंबईत माटुंगा इथल्या ‘डी. जी. रुपारेल’ महाविद्यालयामधून शिक्षण घेतल्यानंतर इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी’मधून पदवी घेतलीय.

‘दे ध’क्का’ चित्रपटानंतर गौरीने ‘शिक्षणाचा आयचो घो’ या चित्रपटातही सक्षमच्या बहिणीची भूमिका साकारली. २०११ मध्ये ‘एकापेक्षा एक जोडीचा मामला’ ह्या रियालिटी शोमध्ये तिने सक्षमसोबत सहभाग घेतला होता.

See also  'लागीर झालं जी' मधील टॅलेंटला लोक या कारणामुळे हिणवायचे, पण आज आहे महाराष्ट्राचा लाडका अभिनेता...

जशी लहानाची मोठी होत गेली तशी तिने वेगवेगळ्या कामात सहभाग अजूनच वाढवला. तिच्या कामाचे अनेक जण तेव्हाही चाहते होते आणि आजही.

gauri vaidya at the press conference of marathi 2895

२०१५ साली तिने आवाहन चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २००७ साली आलेल्या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. यात तिने रूपा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. तिच्यासोबत सचिन खेडेकर, मनोज जोशी, कश्मीरा शाह, अमृता खानविलकर, सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका होत्या.

त्यामुळे आता पुन्हा गौरी चित्रपटात झळकणार का याची उत्सुकता आहे. तर लवकरच ती नव्या चित्रपट मध्ये काम करून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. तर तिला तिच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खुप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment