“दे धक्का” मधील चिमुकल्या गौरीला पाहिलं का ?… आता झालीय इतकी मोठी…. दिसते खूपच सुंदर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो मराठी रंगभूमीवर अनेक चित्रपट आजवर प्रचंड लोकप्रिय झाले आहेत, या चित्रपटाची प्रसिद्धी आजदेखील गगनभरारी घेत असते. तसेच या मराठी चित्रपट सृष्टीत अनेक नामवंत कलाकार देखील आहेत, ज्यांनी आजवर ही रंगभूमी रंगीत ठेवली आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण अभिनयाने रसिक मंडळी नेहमीच हर्षित होऊन मनोरंजनाचा आस्वाद घेत असतात. मित्रहो असाच एक चित्रपट “दे धक्का” मराठी प्रेक्षकांच्यात अतिशय लोकप्रिय आहे. या चित्रपटाची क्रेझ आजदेखील भरपूर प्रमाणात आहे. शिवाय यातील सर्व कलाकार सुद्धा रसिकांचे आवडते बनून राहिले आहेत.

यामध्ये मकरंद अनासपुरे यांचा कॉमेडी अभिनय खूप गाजला आहे. कलाकार जितके अभिनयात तरबेज असतील तितकाच चित्रपट गाजतो. त्यामुळे चित्रपटात स्टार कास्ट देखील भक्कम असावे लागतात.त्यामुळे प्रेक्षक अगदी मनापासून चित्रपट पाहतात व त्या कलाकारांना पसंत देखील करतात. हे कलाकार बघता बघता इतके लोकप्रिय होतात की सोशल मीडियावर सुद्धा त्यांचीच चर्चा सुरू असते. त्यांच्या प्रोफेशनल लाईफ सोबतच पर्सनल लाईफ बद्दल जाणून घेण्यासाठी देखील चाहते खूप उत्सुक असतात. आज आपण अशाच एक बालकलाकार बद्दल जाणून घेणार आहोत जी अतिशय लोकप्रिय आहे.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेता सुयश टिळकचा झाला या अभिनेत्री सोबत साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे त्याची होणारी पत्नी?

मित्रहो “दे धक्का” चित्रपटात शिवाजी साटम, गौरी वैद्य, सक्षम कुलकर्णी, मकरंद अनासपुरे,सिद्धार्थ जाधव यांसारखे आणखी काही अप्रतिम अभिनयाची कला लाभलेले कलाकार होते. गौरी वैद्य ही अभिनय तर उत्तम करतेच शिवाय ती नृत्य देखील अप्रतिम करते आणि याची झलक आपण या चित्रपटात पाहिलीच आहे. पण या चित्रपटात ती प्रसिद्ध झाल्यावर पुन्हा कोणत्याच प्रोजेक्ट मधून ती पडद्यावर फारशी दिसली नाही. सोशल मीडियावर देखील ती जास्त सक्रिय न्हवती, या चित्रपटानंतर तिने आपल्या शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले.

तिने माटुंगा येथील डी. जी.रुपारेल कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी साठी ऍडमिशन घेतले. यामध्ये आता तिने पदवी प्राप्त केली आहे. गौरीने अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे, तिने “शिक्षणाच्या आईचा घो” या चित्रपटात सुद्धा भूमिका साकारली होती. नांतर २०११ मध्ये ती “एकापेक्षा एक जोडीचा मामला” या चित्रपटात देखील झळकली होती. इतकेच नव्हे तर २०१५ मध्ये “आव्हान” चित्रपटात देखील तिने अभिनय केला होता.

See also  'प्रेम करते तुझ्यावर..., आय लव्ह यू', सैराट फेम पारश्याने शेअर केला लेटरचा फोटो, जाणून घ्या कोण आहे 'ती' ?

आता गौरी आपणाला जास्त पडद्यावर दिसत नाही, मात्र तरीही मित्रहो ती खूपच सुंदर दिसते. लहानशी गौरी जिने पैंजनाच्या तालावर सर्वानाच आकर्षित केले होते ती आता मोठी झाली असून अतिशय सुंदर, निरागस आणि देखणी दिसते आहे. लैमलाईट पासून दूर, आपल्या साधेपणाने आजही रसिकांना वेड लावणारी गौरी आता आपणाला पुन्हा एकदा “दे धक्का २” मध्ये दिसणार आहे. गौरीला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी तिचे सर्व चाहते खूप उत्सुक आहेत, तिचे रुपेरी पडद्यावर पुन्हा स्वागतच आहे. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment