प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पादुकोण बनणार आहे खलनायिका, चित्रपटाचे नाव ऐकून थक्क व्हाल!

दिपीका पादुकोण अनेकदा चर्चेचा विषय बनून राहणारी अभिनेत्री आहे. तिने मागे छपाक सारखा दर्जेदार विषयावरील चित्रपटदेखील प्रेक्षकांसमोर मांडला होता. दिपीका आपल्या अदाकारीतून नेहमीच आजवर रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवत आलेली अभिनेत्री ठरली आहे.

दिपीका नृत्य, हावभाव, चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स, संवादाची योग्य लकब, यांसारख्या अधिक चांगल्या गुणांनी प्रतिभासंपन्न अशी अभिनेत्री आहे. बाॅलीवुडमधे आल्यानंतर नानाविध गोष्टींमुळे ती चर्चेत राहिली.

मग ते कधी महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग अथवा रणबीर कपूरसोबत तिच जोडल्या गेलेल्या नावाची चर्चादेखील का असेना. आपल्या सर्वांनाच माहित आहे, दिपीकाचे वडील एक उत्कृष्ठ बॅडमिंटनपटू राहिले आहेत.

आणि तिचीही ईच्छा त्याच क्षेत्रात पाऊल ठेवण्याची होती. परंतु सिनेमाचा गंध तिला छंद म्हणून लागला आणि पुढे आज ती याच क्षेत्रात अफाट नाव, प्रसिद्धी आणि खुप साऱ्या गोष्टींना कमावून बसली आहे.

अ’ड’च’णी’च्या काळातून जात असताना ज्या रणवीर सिंगने तिची मदत कायम केली आज ती त्याची सहचारिणी अर्थातच पत्नीदेखील झालेली आहे. दिपीका नववर्षाच्या पहिल्या ते दुसर्‍याच दिवशी सोशल मीडियावर खास चर्चेचा विषय बनून सर्वत्र झळकताना पहायला मिळाली होती.

त्याच कारण होतं ते म्हणजे, तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील सर्व जुन्या फोटो आणि व्हिडिओजना एकत्र डिलीट करून टाकलं होतं. ही बाब सर्वांना अचानक आश्चर्याचा ध’क्का देऊन जाणारी ठरली होती. तिने नेमकं हे का केलं? याचा खु’ला’सा मात्र अजूनही झालेला नाही.

मुळात सध्यातरी सिनेरसिकांसाठी एक अद्भुत आणि आश्चर्याची गोष्ट कानावर आलेली पहायला मिळते आहे. ती गोष्ट म्हणजे, एरवी आपल्या सौंदर्याने लाखो चाहत्यांना घा’या’ळ करून सोडणारी दिपीका आता स्वत:तील न’का’रा’त्म’क भुमिकेने प्रेक्षकांच मन हेलावून सोडण्यास तयार होत आहे.

अर्थातच तिला “धुम 4” या धुम सिरीजच्या चौथ्या भागासाठी दिपीकाला व्हिलनची भुमिका साकारण्यासाठी विचारण्यात आल्याची चर्चा आहे. आणि दिपीकानेदेखील आपल्या वाट्याला अशा काही भुमिकेची वाट पाहिली असल्याने ती याबाबत सकारात्मक आहे.

निर्मात्यांनी तिला याबाबत विचारणा केली असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा लवकरच मिळेल. दिपीका सध्या पठाण या सिनेमाच्या शु’टीं’ग’म’धे व्यस्त असल्याची खबर आहे. दिपीकाला सध्या तिच्या शु’टिं’ग’च्या शेड्युलमधून फार योग्यरित्या वेळ काढून धुम 4 च्या भुमिकेचा विचार करावा लागणार आहे.

दिपीका, शाहरूख आणि जॉन अब्राहम यांच्या पठाणच्या बहुचर्चित सिनेमाचीही बॉक्स ऑफिसवर ध’मा’ल पहायला मिळण्याची शक्यता आहे. पठाणच्या कहानीमधे जॉन व्हिलनची भुमिका साकारत असल्याचे वृत्त मिळाले आहे.

दुसरीकडे शाहरूख आणि दिपीका ही जोडी ऑनस्क्रीन फारच हि’ट आहे. यापूर्वी “ओम शांती ओम”, “चेन्नई एक्सप्रेस”, “हॅपी न्यू ईयर” अशा सिनेमांमधून दोघांना एकत्र पाहिल्या गेलं आहे. बॉलीवूड सिनेरसिकप्रेक्षकांनी या जोडीलाही भरभरून प्रेम आणि प्रतिसाद आजवर दिला आहे.

याचवर्षी दिपीका फायटर या सिनेमामधून दिपीका ऋतिक रोशन यासोबतही मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. शिवाय बाहुबली स्टार प्रभास यासोबतदेखील तिचा सिनेमा आपल्या भेटीस येत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment