“इतर लोकं नाचत होती आणि मी रणवीरची पँट शिवत होते” अभिनेत्री दीपिका पदुकोणने केला खुलासा…
बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण सध्याचे सर्वांत चर्चेत असलेलं हॉ’ट कपल आहे. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे, प्रत्यक्ष जीवनात सुद्धा ते खूप रोमँटिक आहेत. पडद्यावर जेवढे रोमान्स करतात तसाच खऱ्या आयुष्यात ही करतातच.
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काहीच भरवसा नाही. अश्यात सध्या दीपिकाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे, ज्यात ती रणवीरच्या अनेक गुपित कृ’त्यांचा किस्से सांगत आहे. व्हिडिओ मध्ये दीपिकाने सांगितले आहे की एकदा काय झालं रणवीर सिंगची पँट एका संगीत महोत्सवादरम्यान फाटली होती. आणि मग ती कशी शिवली व पुढे काय काय झालं कसं सांगू.
रणवीर सिंह अनेकदा त्याच्या असामान्य ड्रेसिंगमुळे हेडलाईन्समध्ये राहतो. तो एकमेव असा हिरो असेल की इतरांच्या पेक्षा नेहमी वेगळं काहीतरी करत असतो. कपडे वेगळे घालतो तर कधी ड्रेस. एकदा नाचताना रणवीर सिंगची पँट फाटली होती. त्यावेळी दीपिका पदुकोणने त्याचा सन्मान वाचवला होता.
व्हिडीओमध्ये किस्सा सांगताना नेमकं काय म्हणाली ?.. ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये रणवीरशी संबंधित एक किस्सा सांगताना दीपिकाने सांगितले आहे की, जेव्हा आम्ही एका गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा रणवीर सिंगने सैल पँट घातली होती.
तिथे जाऊन तो काही विचित्र डान्स स्टेप्स करत होता, जेव्हा अचानक त्याची पँट मध्येच फा’ट’ली. अशा परिस्थितीत मी पटकन माझ्या पिशवीतून सुई धागा काढला आणि त्याची पँट टाके घालून शिवली. लोक तिथे नाचत होते आणि मी बसून रणवीरची पँट शिवत होतो.
त्याचवेळी कपिल शर्मा म्हणतो की रणवीर सिंह एक भाग्यवान नवरा आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचे अफेअर ‘राम लीला’ चित्रपटापासून सुरू झाले. शूटिंग दरम्यान दोघे जवळ आले आणि नंतर प्रेमात पडले. या चित्रपटानंतर दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले.
या दरम्यान दोघांचे प्रेम, मैत्री दोन्हीही ही वाढत होते. 2018 मध्ये दोघांनी इटलीमध्ये लग्न केले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आगीच्या वणव्या सारखे पसरले होते. लग्नानंतर आता दोघेही आता ’83’ चित्रपटात दिसणार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे या चित्रपटात दोघेही पती -पत्नीच्या भूमिकेत असतील.