चार मुलांचा वडील होऊनही सैफला सतावते पुन्हा मुलं होण्याची भीती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीचा नवाब अभिनेता सैफ अली खान हा हल्ली कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीत झळकत असतो. बर्याच कालावधीपासून तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक्टिव आहे आणि त्याचे बहुतांश चित्रपट हे सुपरहिट ठरलेले आहेत. याच कारणामुळे त्याचे फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त प्रमाणात आहे. फॅन्सना त्याची एक्टिंग खूप पसंत आहे. त्याचा येणारा प्रत्येक चित्रपट हा बॉक्सऑफिसवर ढिंकचाक गाजतो आणि बक्कळ कमाई करतो. लवकरच आपला हा लाडका अभिनेता सैफ अली खान हा “बंटी और बबली 2” मध्ये दिसणार आहे.

त्यामुळे सध्या सैफ आपल्या या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनात खूप व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रानी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि शारवरी वाग हे लीङ भूमिकेत आहेत. हा चित्रपट 2005 मध्ये आलेल्या “बंटी और बबली” या फिल्म चा सिक्वल आहे. तर आता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम पॉप्युलर शो “द कपिल शर्मा” मध्ये पोहोचली आहे. यामध्ये सैफ अली खान ने आपल्या प्रोफेशनल लाइफ पासून ते अगदी पर्सनल लाइफ पर्यंत सर्व गोष्टी शेयर केल्या आहेत.

See also  आलिया भट्टने आपल्या मोबाईलच्या स्क्रीन सेव्हरवर ठेवला आहे या व्यक्तीचा फोटो, फोटो पाहून व्हाल थक्क

अभिनेता सैफ अली खान हा तिसऱ्यांदा आता कपिल शर्मा यांच्या शो मध्ये पोहोचला आहे. तेव्हा त्यांनी सैफ ला विचारले की, “हा तुमचा आता तिसरा प्रोजेक्ट आहे. पहिल्यांदा “तांङव” नंतर दुसरा “भूत पूलिस” आणि आता हा तिसरा “बंटी और बबली 2″. तर सर तुम्ही सतत काम करत राहता का?? तुम्ही वर्कोहॉलिक आहात की फॅमिली वाढण्याच्या भीतीमुळे तुम्ही टेन्शन घेता का??”

यावर सैफ अली खान ने अगदी मजेशीर उत्तर दिले आहे. तो म्हणाला की, “मी फॅमिली वाढायचे टेन्शन घेत नाही. परंतु मला या गोष्टीची भीती वाटते की मी जर घरी राहिलो, तर कदाचित मी आणखी मुलं काढेल.”

अभिनेता सैफ अली खानला एकूण चार मुलं आहेत. त्याचे पहिले लग्न अमृता सिंह सोबत झाले होते. अमृता पासून त्याला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुलं झाली. अमृता सोबत घटस्फोट घेतल्यावर त्याने करीना कपूर सोबत लग्न केले. तिच्यापासून त्याला तैमूर अली खान आणि जहांगीर ही दोन मुलं झाली.

See also  अभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment