‘देव माणूस’ मालिका सत्य घटनेवर आधारित आहे का? नेमका कोण होता हा न-रा-ध-म डॉक्टर? याची सत्य घटना जाणून थक्क व्हाल.
.
देव माणूस या झी मराठीच्या सायकोथ्रिलर मालिकेबद्दल जाणून घ्या ही थरारक गोष्ट. जर तुम्ही सायको थ्रिलर्सचे चाहते असाल तर झी मराठीची ‘देव माणूस’ नावाची आगामी मालिका तुम्हाला नक्कीच झपाटून टाकेल. झी मराठीच्या या आगामी थ्रिलर शोचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला असून उत्सुकते सोबतच त्याच्यावर “हे इतके भ-या-न-क कसे काय दाखवताय?” असे ट्रोलिंग ही झालेय.
देव माणूसची कथा एका सी-रि-य-ल कि-ल-रची आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या या कि-ल-रला त्याचे पेशंट मात्र देवदूताप्रमाणे समजतात. अशा विचित्र कथानकासह, या मालिकेचे निर्माते व दिग्दर्शक प्रेक्षकांसमोर हा डा-र्क सा-य-को थ्रि-ल-र कसा सादर करणार हे पाहणे फारच रोमांचकारी ठरेल.
झी-5 वरील एका आर्टिकलनुसार, ‘देव माणूस’चे कथानक हे एका डॉक्टरच्या जीवनातील सत्य घटनेवर आधारित आहे. एरवी जो एखाद्या सभ्य माणसाप्रमाणे वागतो आणि आपल्या निष्पाप चेहऱ्याखाली आपले भ-या-न-क रहस्य लपवतो. सातारा जिल्ह्यातील वाई परिसरात प्रसिद्ध असलेला डॉ. संतोष पोळ नावाचा हा खु*नी डॉक्टर. ज्याने स्वतः ३ आणि आपल्या प्रियेसी नर्स ज्योती मांंढरेच्या मदतीने ३ असे अत्यंत निर्दयतेने तब्बल ६ खू*न केले होते.
‘महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षण कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा मंगल जेधे यांच्या अपहरण आणि खु*नाचा संशयित म्हणून डॉ. संतोष पोळला अ-ट-क झाली होती. तपासाअंती पोलिसांना तो दोषी आढळला. त्यावेळी डॉ. संतोष पोळ याने भूतकाळात त्याने स्वतः आणि आपली प्रियेसी नर्स ज्योती मांढरे च्या मदतीने केलेल्या इतर सर्व खु*नांबद्दलही पोलिसांना कबुली दिली होती.
‘देव माणूस’ची कथा याच डॉ. पोळच्या भोवती फिरते. हा डॉ. इंटरनेटवर डॉ. डेथ या नावानेही प्रसिद्ध आहे. झी मराठी शोमधील या सी-रि-य-ल कि-ल-र डॉक्टरची भूमिका लागिरं झालं जी मालिका फेम अभिनेता किरण गायकवाड निभावतोय. ‘देव माणूस’ ही सिरीयल लवकरच समाप्त होणाऱ्या झी मराठीवरील लोकप्रिय हॉ-र-र शो रात्रीस खेळ चालेच्या जागी प्रसारित होणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन राजू सावंत यांनी केले आहे.
झी मराठीवर ‘देव माणूस’ ही सायको थ्रिलर मालिका दि. ३१ ऑगस्ट २०२० पासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. असे आठवड्यातील ६ दिवस प्रसारित होईल. चॅनेल व्यतिरिक्त, Zee5 App. व अधिकृत संकेतस्थळा वरून डाउनलोड करूनही तुम्ही सर्व भाग पाहू शकतात. राजू सावंत दिग्दर्शित सत्य घटनेवर आधारलेला हा स-स्पे-न्स सा-य-को थ्रि-ल-र पहाणे रोमांचकारी ठरणार हे नक्की.