‘देवमाणूस’ मालिकेत हा बाल कलाकार साकारत आहे विठ्ठलाची भूमिका, जाणून घ्या कोण आहे तो बाल कलाकार..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आज मराठी मालिका रसिक प्रेक्षकांना खूप भुरळ घालत आहेत. सध्या झी मराठी, कलर्स आणि इतर चॅनेल वर सध्या लोकप्रिय अश्या मालिका चालू आहेत. त्यात अनेक चांगली चांगली कलाकार मंडळी काम करतात. त्यात प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री आहेतच. त्यात आता बाल कलाकार म्हणून ही अनेकांची भर पडत आहे.

त्यात देवमाणूस म्हणून ही मालिका आणि त्यातील कलाकार, बाल कलाकार खूप चांगलं काम करत आहेत. त्यात एका बाल कलाकाराची भूमिका खूप लोकप्रिय होत आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की तो बाल कलाकार कोण ? आणि काय भूमिका करतोयत. तर चला मग पाहुयात सविस्तर.

See also  'लागीर झालं जी' मधील जयडीची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचे बो'ल्ड फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल, कारण...

देवमाणूस या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मग त्यात सरू आज्जीच्या म्हणी असोत किंवा टोण्या आणि डिंपल या दोन्ही बहीण भावंडामधील कॉमेडी, त्यात भरीस भर म्हणजे नाम्या आणि बज्याची जुळून आलेली केमिस्ट्री या सर्वांमुळे मालिका प्रेक्षकांना पाहायला आवडते.

मालिकेचे कथानक जसजसे पुढे सरकत आहे तशी याची उत्कंठा वाढताना दिसते. मालिकेत सुरुवातीपासूनच “विठ्ठल” चे एक कधीही न बोलणारे पात्र दाखवले आहे. विशेष म्हणजे हे पात्र मालिकेत शुभ अशुभाचे संकेत दर्शवण्याचे कार्य करत असते. महत्वाचं म्हणजे मालिका ही खूप वेगळया विषयावर आहे. जो सर्वांना माहीत आहे.

आज विठ्ठलचे पात्र साकारणाऱ्या बाल्कलकाराबद्दल जाणून घेऊयात… या मालिकेतला विठ्ठल कधीही बोलत नसला तरी त्याचा निरागस चेहरा आणि त्यावरील हावभाव पाहून कुतूहल वाटते. ही भूमिका साकारली आहे “वंश शाह” या बालकलाकाराने. वंश शाह शालेय शिक्षणात हुशार तर आहेच शिवाय डान्सची देखील त्याला विशेष आवड आहे.

See also  या अभिनेत्रीचा मुलगा चालवतो पाव भाजीचे हॉटेल... अभिनयाच्या मागे न लागता निवडला हा मार्ग...

आपल्या वडिलांनाच तो आपल्या आयुष्यातील खरा रोल मॉडेल मानतो . त्यांच्याच प्रेरणेने अभिनयाची आवड त्याच्यात निर्माण झाली. अगदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून कधी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तर कधी बाल लीलया करणारा कृष्णही त्याने साकारला आहे.

नृत्य, अभिनय आणि मॉडेलिंग अशा विविध क्षेत्रात वंश सहज वावरताना दिसतो. देवमाणूस ही त्याची अभिनित केलेली पहिलीच मराठी मालिका असली तरी पुढे जाऊन तो या क्षेत्रात भरीव कामगिरी करेल अशी आशा आहे.

तर अश्या प्रकारे बाल कलाकाराची भूमिका तो उत्तम प्रकारे साकारत आहे. कारण मालिका सध्या तरी प्रेक्षकांना आवडत आहे. वंशला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment