इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करणार्‍या कॉंग्रेसला फडणवीसांचा टोला, म्हणाले ही तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मुंबई: देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. इंधनांच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. राज्यात पेट्रोलची किंमत 107 रुपयांच्या आसपास आहे आणि डिझेलही 100 रुपयाचा पल्ला गाठण्याच्या अगदी जवळ आहे. या मुद्द्यावर कॉंग्रेसने भाजपला घेरण्यासाठी राष्ट्रव्यापी महागाई विरोधात आंदोलन सुरू केले आहे.

महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्यपालांना महागाई विरोधात निवेदन देण्यासाठी सायकलवर गेले होते. हा मुद्दा पकडून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेसचे आंदोलन निव्वळ नौटंकी असल्याचा टोला लगावला.

cycle rally
Nana patole Cycle rally

कॉंग्रेसच्या महागाईविरोधी देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही आज कॉंग्रेसने आंदोलन केले. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, इंधन विक्रीतुन राज्यसरकारला एका लीटर मागे थेट 30 रुपये मिळतात. माझ्या माहिती प्रमाणे मागील वर्षी राज्यसरकारला पेट्रोल-डिझेल मधून तब्बल 24 हजार कोटी रुपये कर मिळाला आहे. जर कॉंग्रेसला खरच इंधन दरवाढ कमी करायची असेल तर इंधनावरील राज्य शासनाचा कर कमी करावा. आज कॉंग्रेस करत असलेले आंदोलन नौटंकी आहे.

See also  अभिनेत्री गायिका केतकी माटेगावकरचा जीवन प्रवास !

दरम्यान, वाढत्या इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. आधीच कोरोनाला रोखण्यासाठी लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला आहे. त्यात वाढत्या महागाईने त्यांचे कंबरडे मोडले आहे. या परिस्थितीमध्ये केंद्र सरकार कडून जनतेला कोणताच दिलासा मिळत नसल्याने लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या गोष्टीचा फायदा घेत कॉंग्रेसने आंदोलन सुरू केले आहे.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment