फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून धक्कादायक मागणी, वाचा काय आहे पत्रात

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. नागपूरमधील कोरोना संसर्ग आता लक्षणीयरित्या कमी झालेला दिसतोय. तसेच सतत होणार्‍या लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक आणि इतर दुकानदारांची स्थिति फार बिकट झाली असून, आता कोरोनाचीस्थिती सुधारात असल्याने त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे नागपूरमध्ये सुरू असलेल्या निर्बंधात सरकारने तत्काळ शिथिलता द्यावी, अशी मागणी करणारे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले.

फक्त नागपूरच नाही तर राज्यातील ज्या भागात कोरोना संसर्ग कमी झाला आहे त्या सर्व ठिकाणी निर्बंधात शिथिलता द्यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच काही ठिकाणी असलेल्या कठोर निर्बंधाविषयी फेरविचार करून त्यात तातडीने शिथिलता देण्यात यावी अशीही मागणी केली.

See also  येसूबाईंनी जिंकली तमाम महाराष्ट्रीयांची मने! प्राजक्ता गायकवाड म्हणाल्या...

व्यापार्‍यांच्या आत्महत्या रोखायला हव्या..

कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या कल्याणमधील एका व्यापार्‍याने आत्महत्या केली तसेच नालासोपर्‍यात सुद्धा एका तरुणाने त्याचे जीवन संपविले. चंद्रपूरातही एका भोजनालय चालकाने आत्महत्या केली. अशा व्यापार्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे ज्या भागात कोरोना कमी आहे त्या भागातील निर्बंध शिथिल करावे. असे या पत्रात नमूद करण्यात आले.

अर्थकारण चुकतय…

सातत्याच्या निर्बंधांमुळे व्यापार संपत चालला आहे आणि त्यातून अर्थकारणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. छोटे दुकानदार, व्यवसायी यांना जगणे कठीण होऊन बसले आहे. हॉटेल्सचा व्यवसाय खरे तर दुपारी 4 नंतर सुरू होतो. पण, 4 वाजता सारे बंद करावे लागत आहे. व्यवसाय अडचणीत आल्याने नोकरदारांना वेतन देणे सुद्धा या व्यवसायिकांना कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती जेथे बर्‍यापैकी आटोक्यात आली आहे, तेथे निर्बंधात तातडीने शिथिलता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा.

See also  दिलासदायक: ‘या’ भागात वीजबिल वसूल न करण्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांचे आदेश

नागपुरात तर फक्त सरासरी 5 रुग्ण दररोज आढळत आहेत. त्यामुळे येथे उगाच कठोर निर्बंध लावणे योग्य नसल्याचेही फडणवीस म्हणाले. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्याची त्यांनी विनंती केली.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment