आजची माता आहे कालरात्री माता, जाणून घ्या माता कालरात्रीची कथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

देवी कालरात्री माता : काल म्हणजे वेळ, समय. काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वाचा साक्षी आहे. रात्री म्हणजे गाढ विश्रांती. शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती. विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो का? कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती असते. देवीचे सातवे रूप ‘कालरात्री’ या नावाने प्रसिद्ध आहे.

नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘सहार’ चक्रात स्थिर झालेले असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षति झालेले असते. तिच्या साक्षात्कारापासून मिळणाऱ्या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते, असे मानतात.

See also  आजची माता आहे माता चंद्रघंटा, जाणून घ्या माता चंद्रघंटा कथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार आहेत. कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अ’ग्नीच्या भ’यं’कर ज्वा’ला निघतात. गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वाना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे.

तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा का’टा आणि खालच्या हातात खड्ग (कटय़ार) आहे. कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भ’य’का’री आहे. परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव ‘शुभंकारी’सुद्धा आहे. देवी कालरात्री दु’ष्टांचा वि’ना’श करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घा’ब’रून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे, असे मानतात. या देवीचे भक्त पूर्णत: भ’यमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे. मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणाऱ्या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते.

See also  आजची नवदुर्गामाता आहे माता ब्रह्मचरिणी, जाणून घ्या माता ब्रह्मचरिणी व्रतकथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

कालरात्री माता पूजन विधी : सर्वात प्रथम संकल्प सोडावा. त्यानंतर एक फुल हातात घेऊन पूजेच्या साहित्यावर थोडं पाणी शिंपडून तोंडाने मंत्र म्हणावा. नंतर दिवा लावून त्याला कुंकू- हळद, फुलं अक्षदा वाहावे. चौरंग ठेवून त्यावर कलश स्थापन करून घ्यावा. त्यालादेखील कुंकू- हळद, फुलं अक्षता वाहाव्यात आणि विडय़ाची पाने लावून नारळ ठेवावा. मग गणेशाची, दुर्गेची पूजा करावी. कुंकू- हळद, फूल, अक्षता वाहावे. धूप-दीप-नवेद्य दाखवून आरती करणे.

खालील दिलेल्या मंत्राचा जप करावा, जेणेकरून कालरात्री देवीची पूजा संपन्न होईल.

१. ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तु ते॥

२. जय त्वं देवि चामुण्डे जय भूतार्तिहारिणि।
जय सर्वगते देवि कालरात्रि नमोस्तु ते॥

३. धां धीं धूं धूर्जटे: पत्नी वां वीं वूं वागधीश्वरी

४. क्रां क्रीं क्रूं कालिका देवि शां शीं शूं मे शुभं कुरु॥

माता कालरात्री बीज मंत्र :

।। ऊं ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ।।

हे स्तोत्र म्हणावे.

माता कालरात्री पूजेचे महत्त्व : माता कालरात्रीची पूजा केल्याने सर्व पापांपासून मोक्ष मिळतो, शत्रूंचा नाश होतो, अशी मान्यता आहे. देवी भक्तांना दुख आणि भीतीतून मुक्त करते आणि भाग्योदय करून, बुद्धी देते.

See also  नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका ही 'चार' कामे, नाहीतर मोजावी लागेल खूप मोठी किंमत...

टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment