अखंड सौभाग्य आणि गृहसौख्यसाठी समस्त सौभाग्यवती महिलांनी मार्गशीर्ष महिन्यात करावे हे काम…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

प्रिय सख्यांनो! सध्या मार्गशीर्ष मासाचे पवित्र पर्व सुरू आहे. आपले सौभाग्यरक्षण तसेच आपल्या घरात धनधान्य, ऐश्वर्य, सुख-समाधान आदि अखंड नांदावे. आपली व आपल्या परिवाराची कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच आर्थिक प्रगती होऊन सर्वांना सुदृढ, निरोगी शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभावे, या करिता आमच्या समस्त भाविक माता भगिनी या पावन पर्वात व्रतवैकल्ये करतात.

हिंदूधर्म शास्त्रानुसार मार्गशीर्ष हा माता श्री महालक्ष्मीचा मास म्हणून मान्यता पावलेला आहे. या मासात माता श्री महालक्ष्मीची आपल्यावर व आपल्या परिवारावर सदैव कृपादृष्टी राहावी म्हणून महिला माता श्रीमहालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारचे व्रत मोठ्या भक्तिभावाने करतात.

सख्यांनो!, मार्गशीर्ष महिन्याच्या या पावन पर्वात जर सौभाग्यवती महिलांनी हे एक छोटेसे काम यथाशक्ती, मनोभावे केले तर श्री महालक्ष्मीची विशेष कृपादृष्टी होऊन शुभफलप्राप्ती होते अशी मान्यता आहे. काय आहे हे छोटेसे पण फलदायी काम? जाणून घ्या.

See also  एका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी, गुंतवणूकदार झाले मालामाल, शेअर मार्केटची कमाल!

।।श्री महालक्ष्मी ओटी।।

या पर्वात येणाऱ्या कोणत्याही गुरुवारी कमीत कमी पाच विवाहित महिलांची मनोभावे ओटी भरावी. ही ओटी सुवासिनींनी सुवासिनी महिलांची भरावी. मार्गशीर्ष मासातील कोणत्याही गुरुवारी म्हणजे अगदी शेवटच्या गुरुवारीही महिला ही ओटी भरू शकतात.

इतर कोणत्याही शुभ प्रसंगी महिलावर्ग ज्याप्रमाणे ओटी भरतात अगदी त्यानुसारच ही ओटी भरावी. एक फळ, १, ११, २१ रुपये दक्षिणारूपाने आणि त्यासोबत श्रीलक्ष्मी मातेची ।।महालक्ष्मीची व्रत कथा।। ही एक पुस्तिका रुपी पोथी तुम्हाला या ओटीमध्ये द्यायची आहे. (साडी वगैरे नाही).

पाच सुवासिनी महिलांची ओटी अवश्य भरावी. कमीत कमी पाच मग यथाशक्ती सात किंवा अकरा असे करु शकता. ही ओटी कोणत्याही गुरुवारी किंवा ज्या गुरुवारी व्रताचे उद्यापन कराल, त्या दिवशी सुद्धा तुम्ही ही ओटी भरू शकता.

See also  जॉनी लिव्हरची दोन्ही मुलं आहेत लंडन उच्चशिक्षित, मुलगी आहे खूपच सुंदर आणि मुलाची आहे सिक्सपॅक बॉडी...

यथाशक्ती तांदूळ वा गहू, सोबतच एखादी सौभाग्याचे प्रतीक असणारी प्रमुख वस्तू तुम्ही त्या ओटीत द्यावी. जसे कुंकवाचा करंडा, कुंकू डबी, मेहंदीचा कोन, ब्लाऊज पीस इ. श्री महालक्ष्मी कृपेस्तव समस्त सौभाग्यवती महिलांनी मनोभावे सुवासिनींची ओटी अवश्य भरावी….

टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment