देवमाणूस 2 मालिकेत ही प्रसिद्ध विनोदी मराठी अभिनेत्री घेणार दमदार एंट्री…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

झी मराठीवरील देवमानुस 2 मालिकेत एक वेगळा ट्विस्ट आला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे.  डिंपलच्या नावावर असलेल्या जमिनीसाठी आमदार देवयानी गायकवाड यांनी डॉक्टर मॅडम यांना 10 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. आणि याच पैशाच्या लोभापायी डॉक्टर आणि डिंपल आमदार मॅडमच्या जाळ्यात अडकणार की काय अशी शंका या मालिकेच्या प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाली आहे.

तर दुसरीकडे इन्स्पेक्टर जामकर हा डॉक्टरांच्या मागे हात धुवून लागले असल्याचं सुद्धा दिसत आहे. आधी आमदाराच्या पत्नीमुळे डॉक्टरची तुरुंगातून सुटका झाली होती, मात्र आता आमदाराच्या पत्नीच्या मिरवणुकीतच या डॉक्टरने मी एक नाही, दोन नाही, चार पण नाही तर तब्बल 38 खून केल्याचा खुलासा केला आहे. आणि आता यामुळे इन्स्पेक्टर जामकर हे पुरावे हाती नसताना देखील डॉक्टर ला कसे आत टाकतात याची अधिक उत्सुकता लागली आहे.

See also  बिगबॉस फेम ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, लग्नाचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

आता जामकर यांना मदत करणारी मार्तंड जामकर यांची पत्नी लवकरच मालिकेत एन्ट्री करणार आहे. ही व्यक्तिरेखा चला हवा येऊ द्या फेम कॉमेडी अभिनेत्री स्नेहल शिदम साकारणार आहे. स्नेहल शिदम आता देवमानुस 2 या मालिकेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असणार आहे. डॉ.अजितकुमार देव आणि डिंपल यांच्याकडून सत्य जाणून घेण्यासाठी ती जामकर यांना मदत करणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

स्नेहल शिदम ‘चला हवा येऊ द्या हो दे व्हायरल’ची विजेती ठरली. तिच्या या विजयामुळे ती चला हवा येऊ द्या आणि थुकरटवाडीचा एक अतिशय महत्त्वाचा घटक बनली आहे. आता या मंचावर तिच्या अनुपस्थितीची कोणी कल्पनाही करू शकत नाही, इतकी ती प्रेक्षकांची खास पसंती बनली आहे. पण आता स्नेहलच्या देवमानुस 2 या मालिकेत एंट्री झाल्यामुळे तिने चला हवा येऊ द्या या मालिकेतून काही काळ ब्रेक घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

See also  मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकरने सोशल मीडियावर शेअर केले फोटो, फोटो होत आहे व्हायरल...

खरंतर या शोने स्नेहल ला अनेक मालिकांमध्ये काम करण्याची संधी दिली आहे. भगो मोहन प्यारे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये स्नेहल ला छोट्या-मोठ्या भूमिका मिळत होत्या. कॉलेजमध्ये असल्यापासून स्नेहल एकांकिका आणि नाटक स्पर्धांमध्ये काम करत होती.
एक संधी म्हणून, तिने होऊ दे व्हायरलमध्ये सहभागी होण्यासाठी ऑडिशन दिली आणि सर्व स्पर्धकांमधून तिने तिच्या उत्कृष्ट कामगिरीने शो जिंकला.

स्नेहलचा अभिनय क्षेत्रातील प्रवास खूपच उल्लेखनीय राहिला आहे पण या प्रवासात अनेक अडथळे पार करत तिने यशाचे शिखर गाठले आहे. स्नेहलने एका मुलाखतीत सांगितले होते की, तुमच्या दिसण्यावरून आणि रंगाच्या आधारे तुमच्या जवळच्या लोकांनीच तुम्हाला नावे ठेवल्यावर खूप वाईट वाटते. मात्र या सर्वांवर मात करत स्नेहल ने आपले ध्येय गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहे आणि अशा प्रकारे तिने आज तमाम प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

See also  "हा" प्रसिद्ध मराठी अभिनेता साकारतोय 'दख्खनचा राजा ज्योतिबाची' भूमिका, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

देवमानुस 2 मालिकेत डॉक्टर आणि डिंपलच्या कटाचा लवकरच पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांची ही इच्छा पोलीस निरीक्षक मार्तंड जामकर यांच्याकडून पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. आणि आता जामकर यांना त्यांच्या पत्नीची साथ मिळणार की नाही हे पाहणे विशेष राहणार आहे. बाकी स्नेहल शिदमचे या नवीन भूमिकेबद्दल अभिनंदन.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment