“धनंजय माने इथेच रहातात का?” अभिनेते किरण मानेंनी शेअर केलीय या “अजरामर” डायलाॅगची जन्मकथा…

मित्रांनो!, हिंदीत शोले आणि मराठीत अशी ही बनवा बनवी (Ashi Hi Banwa Banwi) हा चित्रपट पाहिला नाही असा रसिक प्रेक्षक शोधूनही सापडणार नाही. आजही हा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारुड करून भुरळ घालतो आणि पोट धरधरून हसायला भाग पाडतो.

whatsapp image 2021 04 30 at 10.58.55 am 202104608142

‘अशी ही बनवा बनवी’ सिनेमाची  ३२ वर्षानंतरही जादू कायम आहे. सचिन पिळगांवकर दिग्दर्शित सिनेमाने रसिकांची तुफान पसंती मिळवली होती. सिनेमातल्या प्रत्येक व्यक्तिरेखा आजही तितक्याच रसिकांच्या लक्षात आहेत. सिनेमातले डॉयलॉग आजही तितकेच फेमस आहेत. अधून मधून डॉयलॉगचा वापर करत विनोदी मिम्सही व्हायरल होत असतात.

यात धनंजय माने इथेच राहतात का ? हा डायलॉग आजही प्रचंड फेमस आहे. हा डायलॉग कसा घडला या मागेही एक खास किस्सा सुप्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने यांनी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे व तो प्रचंड व्हायरल होत आहे. हीच व्हायरल पोस्ट आमच्या वाचकांसाठी खास.

READ  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण, नाव ऐकून थक्क व्हाल!

kiran mane

“खरंतर यापूर्वी या पात्रासाठी आडनावाची गरज जाणवली नाही… पण परशा जेव्हा दार ठोठावतो, तेव्हा त्यानं पूर्ण नांव घ्यायची गरज आहे.” त्याला कुठलं आडनांव शोभेल? याचा सचिन पिळगांवकर – वसंत सबनीस वगैरे लोक व्ही. शांताराम यांच्या ऑफीसमध्ये विचार करत बसले होते…

बरीच आडनांवं सुचत होती पण कुणाचं समाधान होत नव्हतं…एवढ्यात व्ही. शांताराम दाराकडे पाहून म्हणाले, “या या माने.. काय काम काढलंत?”  व्ही. शांताराम यांचे सी.ए. किसन माने आले होते. त्यांना काही कागदपत्रांवर व्ही. शांताराम यांच्या सह्या हव्या होत्या. ‘त्या’ हाकेनं चर्चेच्या वेळी असं टायमिंग साधलं होतं की त्यांच्या सह्या होईस्तोवर सचिनजी आणि वसंत सबनीसांनी ठरवून टाकलं की त्या पात्राचं आडनाव ‘माने’ हेच असेल !!!

READ  हे मराठी कलाकार आहेत महागड्या गाड्यांचे मालक, या अभिनेत्रींच्या गाडीची किंमत ऐकून थक्क व्हाल!

yuty

.. मिटींग संपता-संपता व्ही. शांताराम यांनी किसन मानेंना पुन्हा त्यांच्या केबिन मध्ये बोलावून घेतले आणि हसत-हसत विचारलं की “माने तुमचं आडनाव आमच्या सिनेमातल्या ‘धनंजय’ या पात्राला वापरायला तुमची काही हरकत नाही ना?” केबिनमध्ये हास्यकल्लोळ उसळला…

…आणि संपूर्ण मराठी मुलखात हास्यकल्लोळ उसळवणारा तो ‘अजरामर’ डायलाॅग जन्माला आला – “धनंजय माने इथेच रहातात का?”किसन माने यांचे चिरंजीव विक्रम माने माझ्या फ्रेन्डलिस्टमध्ये आहेत… त्यांनी एक दिवस इनबाॅक्स मध्ये ठकठक केलं “किरण माने इथंच रहातात का?”…आणि मला ही घटना सांगीतली.

लै भारी वाटलं… म्हन्लं, मी हा किस्सा फेसबुकवरून दोस्तलोकांना सांगू का? तुमची काही हरकत नाही ना? नाही तर पुन्हा म्हणाल,
“हा शुद्ध हलकटपणा आहे माने !” 😂😂😂
– किरण माने.

READ  ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्न बंधनात, अभिनेत्रीचे होणाऱ्या नवऱ्या सोबतचे फोटो झाले व्हायरल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment