कुठून झाली पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या वा’दाची सुरुवात; वाचा, गोपीनाथ मुंडें हयात असताना घडलेला किस्सा

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

जगभरात राजकीय घराण्यांचा इतिहास बं’डखोरीचा आहे. जिथे सत्ता असते तिथे बं’डखोरीही आपोआप येते. महाराष्ट्राची राजकीय घराणीही त्याला अपवा’द नाहीत. ठाकरे, मुंडे, बीडचे क्षीरसागर आणि अगदी पवारही याला अपवा’द नाहीत. पवारांमध्ये थेट फु’ट पडली नसली तरी एकमेकांविषयी नाराजी असल्याचे आजवर बघायला मिळाले आहे. आज कै. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि मुलगी माजी मंत्री पंकजा मुंडे हेही थेट एकमेकांच्या वि’रो’धा’त राजकारणात आहेत.

खरे तर महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या राजकारणाला मोठे महत्व आहे. मुंडे यांच्याबाबतीतही हेच घडले. गोपीनाथ मुंडे हे भाजपकडून राज्याच्या राजकारणात सक्रीय होते. तर त्यांचे मोठे बंधू पंडितअण्णा मुंडे हे गोपीनाथ मुंडेंच्या पाठीमागे त्यांच्या मतदारसंघातील राजकारण सांभाळत होते. हळूहळू पंडितअण्णाही मतदारसंघात लोकप्रिय होऊ लागले आणि त्यांनाही जिल्हा पातळीवर राजकीयदृष्ट्या विशेष महत्व प्राप्त झाले.

Advertisement

हळूहळू काकांच्या पाऊलावर पाऊल टाकत पंडितअण्णा यांचे चिरंजीव जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय झाले. सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले तर पुढच्या टर्मला ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदी विराजमान झाले. पक्षाव्यतिरिक्त धनंजय यांच्या मागे तरुणांची मोठी फौज उभा होती. काकांच्या हाताला धरून धनंजय मुंडे यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष झाले. धनंजय मुंडेही आता राज्याच्या राजकारणातील हवा समजून घेऊ लागले होते. दरम्यान 2009च्या सुमारास गोपीनाथ मुंडे हे राज्याच्या राजकारणात सक्रीय झाले.

See also  राज्यात कोरोना निर्बंधातून लवकरच मिळू शकते सूट, जाणून घ्या उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले

आता राज्याचे राजकारण धनंजय यांना खुणावत होते. काकांची राज्यातील जागा आपणच भरून काढता येईल का? याचा अंदाज धनंजय मुंडे घेत होते. अशातच पंकजा मुंडेही हळूहळू मतदारसंघात फिरू लागल्या. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊ लागल्या. धनंजय यांच्या नजरेत या गोष्टी आल्या मात्र त्यांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. कारण काकांची जागा आपल्यालाच आहे, असे त्यांना वाटत होते. पंकजाताई आता थेट महिला बचतगट, जलसंधारण असे कार्यक्रम राजकीय धोरणाने करू लागल्यावर मात्र धनंजय मनातून नाराज झाले. मात्र त्यांनी तसे दाखवले नाही.

Advertisement

दरम्यान आता भाजपकडून धनंजय यांना विधानपरिषदेवर घेतले होते. लोकांमधून निवडणूक लढवायची सवय असलेल्या धनंजय यांना आता काकांची जागा आपल्याला घेता येणार नाही, हे पुरते समजले होते. अशातच अजितदादा पवारांचे बीडवरती लक्ष होते. उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचे मेहुणे केंद्रे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला. दरम्यान राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात धनंजय आणि पंडितआण्णा मुंडे उपस्थित होते. गोपीनाथ मुंडेना काहीतरी वेगळा प्रकार असल्याचे एव्हाना लक्षात आले होते.

See also  राज ठाकरे मला ‘त्या’ व्हिडिओंच्या लिंक पाठवणार आहेत: चंद्रकांत पाटील

‘राजकारण एवढे वाईट झाले आहे कि एखाद्या व्यक्तीला जेव्हा मैदानात हरवता येत नाही तेव्हा त्याला पूर्णपणे उ’ध’व’स्त करायचं कसं याबाबत ष’ड्यं’त्र रचले जातंय. माझं आयुष्यच २००२ पासून ष’ड्यंत्रा’त गेले आहे. २००२ साली अध्यक्ष होण्याची वेळ आल्यावर आमच्याच सहकाऱ्यांनी सदस्य का पळवून नेले हे ष’ड्यं’त्र मला कधी कळले नाही’, अशीही खंत धनंजय मुंडे यांनी मधल्या काळात बोलून दाखवली होती.

Advertisement

तसेच ‘२००९साली  उमेदवारी मिळण्याचं ठरल्यावर ‘ध’ चा ‘प’ कसा झाला हे मला आणखीन काळालं नाही त्यामागे काय षड्यंत्र होते. आज इथपर्यंत आल्यावर सुद्धा काय ष’ड्यं’त्र चाललं आहे हे मला कळत नाही’, असेही ते म्हणाले होते.

2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले त्यानंतर या रिक्त जागेवर धनंजय यांनाच उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती मात्र तर ऐनवेळी पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली.

Advertisement
See also  आमिर खान आणि किरण राव यांच्याप्रमाणेच शिवसेना-भाजपची मैत्री कायम राहील – संजय राऊत

नंतर 2012 च्या नगरपालिका निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीशी अंतर्गत संधान साधले असल्याचे बोलले. भाजपमधील काही समर्थक आणि राष्ट्रवादीचे काही सदस्य धनंजय यांनी निवडून आणले. आता मात्र धनंजय यांचा वेगळा विचार असल्याचे अवघ्या बीडला समजत होते. कारण भाजपकडून निवडून आलेल्या धनंजय मुंडे समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

अशातच दसरा मेळावा आला आणि भगवान गडावर नामदेव शास्री आणि गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या बं’ड’खोरीचे संकेत दिले. पुढे काही दिवसात तेच घडले. धनंजय यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आणि त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना मोठमोठ्या संधी दिल्या. आणि पक्षाने दिलेल्या संधीचं धनंजय यांनीही सोनं केलं.

Advertisement

राष्ट्रवादी प्रवेशानंतर बीड आणि परळीतल्या स्थानिक सत्तास्थानांपासून ते विधानसभेपर्यंत ‘डीएम’ विरुद्ध ‘पीएम’ अशी कटू ल’ढा’ई चालली. 2019 ला परळीत पहिल्यांदा धनंजय यांच्याकडून पंकजा यांचा प’रा’भ’व झाला. मधल्या काळापासून एकमेकांच्या वैयक्तिक अडचणीच्या काळात पाठिंबा दर्शवणं, हे पंकजा आणि धनंजय मुंडे सातत्यानं करत आले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर वा धनंजय यांचे वडील पंडितराव मुंडे यांच्या नि’ध’ना’नंतर दोघेही एकमेकांना भावनिक आधार देण्यासाठी पुढे आले होते.

Advertisement

Leave a Comment

close