असा झालो धन्याचा धनुभाऊ, आणि आता कॅबिनेट सामाजिक न्याय मंत्री….

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बीड जिल्ह्यातील मुंडे घराण्याचं राजकारण हे अख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. माजी केंद्रीय मंत्री भाजपा नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, यांच्या २०१४ मध्ये झालेल्या अ*प*घा*ती मृ*त्यू*नंतर मुंडे घराण्यातील काका पुतण्याचं राजकारण हे भाऊ बहिणीवर येऊन ठेपलं. राजकारणात संघर्ष असतो. चढ उतार येतात. हेवे – देवे, पद आणि आरोप अश्या गोष्टीतून वादविवाद निर्माण होत असतात. राजकीय क्षेत्रात सुद्धा अनेक संकटाना तोंड देऊन पुढे चालावं लागतं.

स्वतःच्या हिमतीवरचं कर्तुत्व महाराष्टातील जनतेला दाखवून, राज्याच्या क्याबिनेटमध्ये सामाजिक न्याय मंत्री म्हणून सध्या नेतृत्व करणाऱ्या धनु भाऊंची खूप खडतर संघर्षगाथा आहे.

धनंजय पंडितअण्णा मुंडे यांचा जन्म १५ जुलै १९७५ रोजी बीड मधील परळीत झाला. पंडित आण्णा मुंडे यांचे सुपुत्र होते तर महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाचं वजनदार नेतृत्व असणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांचे ते पुतणे होते. घरामध्ये खाता-पिता राजकारण असल्याने त्यांनी सुद्धा लहानपणीच राजकीय क्षेत्रात उतरायचा निर्णय घेतला होता. परळीत शालेय शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्यात घेतलं. नंतर वकिलीचं एलएलबी शिक्षण पुण्याच्याचं प्रसिद्ध अश्या सिंबॉयसीस कॉलेज मधून पुर्ण केलं.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष महाराष्ट्र, ही मोठी जवाबदारीने पेलवून धनु भाऊंनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे २००२ ते २००७ मध्ये त्यांनी झेड पी सदस्य म्हणून ही पद सांभाळलं. चुलते गोपीनाथ मुंडे यांना मुलगा नसल्याने धनंजय मुंडेनाच त्यांनी मुलगा मानलं. पण गोपीनाथ मुंडेना मुलगा नसला तरी पंकजा, प्रीतम आणि यशश्री या तीन मुली होत्या. त्यातील प्रीतम डॉक्टर होऊन, लग्न करून संसाराला लागली. यशश्रीचा राजकारणाशी फार काही संबंध नव्हता; पण आपल्या पित्याच्या राजकीय खेळाला पंकजा चांगलीच ओळखत होती. पाहून पाहून शिकत होती. राजकारणात धनु भाऊंनी पंकजाच्या आधी एन्ट्री केली होती. पण कुटूंब म्हंटले की वादविवाद येतातच. आपला परकेपणा तयार होतोच.

See also  आनंदाची बातमी! या देशाने लाँच केली कोरोनाची पहिली लस, जाणून घ्या काय असेल किंमत आणि भारतात कधी येणार...

पंकजा मुंडेनी राजकीय क्षेत्रात उतरायचा निर्णय घेतल्यावर मात्र धनंजय मुंडेच्या राजकारणाला गळती लागली. गोपीनाथ मुंडेनी ही आपल्या मुलीच्या राजकीय प्रवासाला प्राधान्य दिलं. एक बाप म्हणून ते त्यांची जवाबदारी योग्य प्रकारे पेलवत होते. पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला डावललं जातं आहे. इथून पुढं सुद्धा डावललं जाऊ शकतं. याची भीती धनु भाऊंना आतून पोखरायला लागली होती.

अश्यातच २००९ च्या निवडणुकीत परळी विधानसभा क्षेत्रात भाजपा कडून आपल्यालाच तिकीट मिळेत, या कोरडया आशेवर बसलेल्या धनु भाऊंच्या राजकारणाला मोठा धक्का बसला, तिकीट कापल्या गेल्याने. पंकजा मुंडेना तिकीट देण्यात आलं होतं. त्या तिकिटावर त्या आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून ही आल्या होत्या. त्यामुळे पंकजा मुंडेचं धनंजय पेक्षा जास्त वर्चस्व वाढत होतं.

पुढं हळूहळू गोपीनाथ मुंडे आणि बीजेपी पार्टीमध्ये धनंजय मुंडेची घुसमट होऊ लागली. काका पुतण्याचं राजकारण महाराष्ट्रासमोर येऊ लागलं. त्यामुळे शेवटी धनंजय मुंडेनी ‘ एकला चलो ’ म्हणत वडिलांसह २०१२ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला. राष्ट्रवादीला ही बीड मध्ये गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात त्यांच्याच घरातला तगडा नेता भेटला होता. कारण शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचं राजकीय नातं साऱ्या देशालाच माहितेय. गोपीनाथ मुंडेचा पराभव करण्यासाठी सक्षम उमेदवाराच्या शोधात असताना राष्ट्रवादीला धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेना राष्ट्रवादी मिळनं म्हणजे मोठा योगयोगचं.

See also  "बजरंगी भाईजान" चित्रपटातील मुन्नीला मिळाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, राज्यपालांच्या हस्ते सन्मानित...

पक्षांतर केल्याने धनंजय मुंडेचं राजकीय वजन हळूहळू वाढू लागलं होतं. राष्ट्रवादी पक्ष वाढविण्याचं काम धनु भाऊंनी झपाट्याने सुरु केलं होतं. त्यामुळे खूप कमी काळात धनु भाऊ अजित पवारांचे विश्वासू नेते बनले होते. पुढे २०१४ मध्ये धनु भाऊंनी पंकजाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली. पण त्या काळात जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती दुर्दैवी निधनानंतर भावनांची मोठी लाट पसरली होती. त्यासोबत देशात मोदी लाट ही पसरली होती. या दोन्ही लाटेमुळे धनंजय मुंडेना पुन्हा अपयश आलं. पण त्यांच्या आक्रमी नेतृत्वाने हळूहळू राज्य परिचित होत होता. २०१४ नंतर राज्यात सत्तांतर झालं. आणि बीजेपी शिवसेना सत्तेत आली.

कॉंग्रेसकडे विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद गेलं तर राष्ट्रवादीकडे विधानपरीषदेचं विरोधी पक्षनेतेपद आलं होतं. तेव्हा शरद पवारांनी आक्रमक नेतुत्व असलेल्या धनंजय मुंडेना विधान परिषदेवर आमदार करून विरोधी पक्ष नेता केलं.

मग सुरु झाला खरा राजकीय प्रवास. राज्यभर फिरून वेगाने सभा घेत सरकार वर तीव्र शब्दात हल्लाबोल सुरु केला. त्यानंतर धनंजय मुंडे फक्त बीड मध्ये नाहीतर राज्यात लोकप्रिय झाले. सोबत परळी विधानसभा, बीड जिल्हा असो किंवा महाराष्ट्र फक्त फोनवर सुद्धा धनंजय मुंडेनी छोटयातली छोटी कामे करून जनतेच्या मदतीला धावुन मदत करायला सुरुवात केली. हळूहळू ते परळीकरांच्या साठी खरे राजकीय शिलेदार म्हणून पसंतीस पडू लागले.

पाच वर्षं विरोधी पक्षनेते पदाची जवाबदारी सांभाळत त्यांनी परळीकरांचे खूप कामे केली. ‘ जिथं इतर कमी तिथं धनु भाऊची हमी ’ एकंदरीत असचं समीकरण तिथं बनलं होतं. तळागाळातील जनतेच्या सेवेला धावून गेल्याने भाऊंची लोकप्रियता परळी, बीड सोबत राज्यात वाढू लागली होती.

See also  या व्यक्तीने गर्लफ्रेंडच्या बेडरूममध्ये केला असा पराक्रम, झाला अब्जोवधींचा मालक!

२०१९ ची विधानसभा निवडणूक जवळ आली होती. त्यामुळे धनु भाऊंनी प्रचाराचं काम जोरात सुरु केलं. राज्याच्या सभेची जवाबदारी पेलवत स्वतःच्या क्षेत्राची सुद्धा जवाबदारी धनु भाऊ जोमाने पेलवू लागले. अनेक सभांमध्ये धनु भाऊंनी जनतेला संघर्षाच्या काळात आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांची साद घालायला सुरुवात केली. परळीतल्या एका सभेत धनु भाऊ असे म्हणले होते की माय बाप जनता, मला तांदळात असलेल्या खड्याप्रमाणे उचलून फेकून देण्यात आलं होतं. मान सन्मान तर सोडाच पण नाव सुद्धा नीट घेतलं जात नव्हतं. धन्या, म्हणायचे मला. धन्या ! पण आज तुम्ही मायबाप मला धनुभाऊ म्हणतात. कारण माझ्या प्रामाणिक सेवेच्या स्वरुपात तुम्ही मला आदर देत आहात. तर तुमच्या भाऊला तुमची सेवा करण्याची एकदा तरी संधी दया. तुमची जर मी गेल्या पाच वर्षांत सेवा केली असेल तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी द्याल.

शेवटी परळीकरांनी धनंजय मुंडेवर विश्वास टाकला आणि तब्बल ३१००० हजार लीड ने निवडून दिलं. हे भाऊंचं खूप मोठं यश. पुढे राज्यात समीकरणे बदलली आणि धनु भाऊ सध्याच्या ठाकरे सरकार मध्ये क्याबिनेट सामाजिक न्याय मंत्री झाले.

” अयपश ज्याला पचवता येतं. त्यालाच यश मिरवता येतं. अश्या उक्तीप्रमाणे एकेकाळी धन्या म्हणून जगणाऱ्याचा धनु भाऊ झाला. आणि धनु भाऊंचा आज सामाजिक न्याय मंत्री झाला..”

लेखक – कृष्णा वाळके

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment