‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या घरी लहान बाळाचं आगमन…

Advertisement

तमाम महाराष्ट्राच्या पसंतीस उतरलेलं पात्र म्हणजे, वहिनीसाहेब. “तुझ्यात जीव रंगला” या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत “नंदिता” नावाच्या पात्राच्या नकारात्मक भुमिका ज्या अभिनेत्रीने बखुबी साकारली ती अभिनेत्री म्हणजेच धनश्री काडगावकर. धनश्रीला या मालिकेत वहिनीसाहेब या नावाने ओळखलं जायचं.

dhanashri kadgaonkar in tuzhat jeev rangala episode 300 2017

Advertisement

एक वेगळा रूबाब, ल’क’ब आणि आपला वट कायम लोकांमधे पहायला आवडणारं असं काहीस हे पात्र. या पात्राला अगदी सहजरीत्या नकारात्मकतेचा तो लहेजा पूर्णत: चढवत धनश्री काडगावकरने खऱ्या अर्थाने आपल्या अभिनय कौशल्याची छाप रसिकप्रेक्षकांच्या मनावर सोडली असचं म्हणावं लागेल.

आता खास आणि जबरदस्त बातमी म्हणजे, धनश्रीला झाली आहे पुत्रप्राप्ती. धनश्रीच्या घरी नुकत्याच नव्या बाळाचं आगमन झालेलं पहायला मिळतं आहे. धनश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. ती म्हणाली की, “आमचा आनंद सर्वांसोबत शेअर करायला आम्ही उत्सुक आहोत.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे पडलीये या मराठी अभिनेत्याच्या प्रेमात, जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता...
Advertisement

dhanashri kadgaonkar 11 2

आज सकाळीच मी मुलाला जन्म दिला. माझी आणि बाळाची दोघांचीही प्रकृती चांगली आहे.” अशा एका पोस्टसहीत धनश्रीने चाहत्यांना तिच्या घरी आगमन झालेल्या नव्या पाहुण्याची बात सांगितली. तुझ्यात जीव रंगला मधून घराघरात पोहोचलेली नंदिता अर्थात वहिनीसाहेब खऱ्या आयुष्यात अगदी विरूद्ध प्रकारची व्यक्तिरेखा असल्याच वारंवार आपल्याला पहायला मिळत आहे.

Advertisement

धनश्री काडगावकरच्या घरी एक नवा पाहुना येणार याची चाहूल तेव्हाच सर्वांना होती जेव्हा तिने सोशल मीडियावर सर्वप्रथम एक व्हिडिओ शेअर करत, “कुणीतरी येणार गं” अशा कॅप्शनसहीत पोस्ट अपलोड केली होती. विशेष म्हणजे ही पोस्ट तिने चक्क तिच्या पतीच्या वाढदिवसादिवशी पोस्ट केली होती.

Advertisement

दुर्वेश देशमुख हा धनश्रीचा पती आहे. तो पुण्यातला स्थायिक असून एक इंजीनिअर आहे. धनश्री काडगावकरने आजवर मराठी नाटकांमधूनही काम केलं आहे. धनश्री तसं पाहता आज मराठीत एक ट्रेंड सेटर झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. तिने मागेच काही काळापुर्वी नव्या स्टाईल्सचे फोटो शेअर केल्यानंतर एक नवा स्टाईल आयकाॅन म्हणून तिचा चेहरा सोशल मीडियात प्रसिद्ध झाला होता.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता परब अ'डकली लग्नबंधनात, लग्नाचे फोटो पाहून थक्क व्हाल!

सोशल मीडियावर अगदी काल परवाच तिच्या बेबी बंप सोबत झालेल्या फोटोशुटचे फोटोज आणि बातम्या व्हायरल होत होत्या, सर्वत्र तिच्या हटके लुकची चर्चा रंगली होती. आणि अशावेळी तिने सर्वांना थेट आश्चर्यकारक बातमी देत सरप्राईज दिलं.

Advertisement

2018 साली आलेल्या चिठ्ठी या मराठी सिनेमातही धनश्रीने भुमिका निभावली होती, गंध फुलांचा गेला सांगुनी या धनश्रीच्या मालिकेलाही त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. ही मालिका इटीव्ही मराठी वाहिनीवर तब्बल दोन वर्षे चालली. मुळात आता धनश्रीच्या अर्थात आपल्या लाडक्या वहिनीसाहेबांच्या घरी नवं बाळ आलं असल्याने, धनश्री अत्यंत आनंदी आहे. निश्चितच सर्व रसिकप्रेक्षकही तिच्या आनंदात सहभागी आहेत.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

See also  अश्या प्रकारे साजरी केली प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींनी यंदाची मकर संक्रांती, पहा अभिनेत्रींचे संक्रांती विशेष फोटो...
Advertisement

Leave a Comment

close