“तुझ्यात जीव रंगला” फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने ट्रोलर्सची केली बोलती बंद, तिखट शब्दांत चांगलेच सुनावले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“मातृत्व” प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण वळण. आईपणाचे सुख अनुभवण्यासाठी प्रत्येक स्त्री ही उत्सुक असते. परंतु या महत्त्वाच्या वळणावर स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल घडून येतात. जसे की स्थूल होणे, केस गळणे इ. सर्वसामान्य स्त्री असो किंवा मग एखादी अभिनेत्री असो. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात प्रेग्नेंसी ही महत्त्वाची असते. यादरम्यान तिला स्वतःचे सौंदर्य महत्त्वाचे नसते, तर तिला आपले मूल व आईपणाच्या भावना जास्त महत्त्वाच्या असतात.

dhanashri kadgaonkar in tuzhat jeev rangala episode 290 2017

झी मराठी वाहिनीवरील “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेतील आपल्या लाडक्या वहिनीसाहेब यांची भूमिका निभावणारी अभिनेत्री म्हणजे धनश्री काङगावकर. सणसणी ङोक्याच्या आणि गावंडळ भाषेच्या या मॉर्ङन वहिनीसाहेबांनी आपल्या भूमिकेने सर्व प्रेक्षकांच्या मनावर अफाट राज्य केले.

See also  अबब! मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने आपल्या मोहक फोटोंनी चाहत्यांवर केली जादू, फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री धनश्रीने एका गोंडस, गोर्यापान मुलाला जन्म दिला आहे. ही गोङ बातमी तिने आपल्या सोशल मीडियावरून चाहत्यांना शेयर केली होती. तसेच आपल्या अकाउंटवर तिने आपल्या चिमुकल्या सोबतचे कित्येक फोटो देखील शेयर केले. यादरम्यान तिचे वाढलेले वजन पाहून तिला काही जणांनी ट्रोल करण्याची सुरुवात केली.

dhanashri kadgaonkar in tuzhat jeev rangala episode 933 2019

परंतु तुम्हांला तर ठाऊकच आहे की, आपली ही धनश्री शांत बसून ऐकणार्यांपैकी मुळीच नाही. त्यामुळे तिने सुद्धा हे ट्रोल करण्यात आलेल्यांना चांगले तिखट शब्दांत जबरदस्त उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर तुम्ही पाहिलेत तर समजेल की, खूपच अनादर करणाऱ्या या कमेंट मधून तिला ट्रोल केले गेले आहे.

“अशा प्रकारे एखाद्या महिलेचा तुम्ही अपमान करता का? इन्स्टाग्रामवर स्वतःचे खरे नाव ठेवण्याची सुद्धा तुमची हिंमत नाही. या व्यक्तीला ताबडतोब रिपोर्ट करा. असे अभिनेत्री धनश्रीने म्हटले आहे. पुढे तिने संपूर्ण इन्स्टाग्राम कुटुंबाचे आभार देखील मानले आहेत. तसेच मी फुटबॉल झाली, अशी कमेंट करणाऱ्यांना सुद्धा माझ्या फॉलोअर्सने रोखठोक उत्तर दिले आहे. याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानते.” असे धनश्री काङगावकर हिने म्हटले आहे.

See also  हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पडलीये या CSK क्रिकेटरच्या प्रेमात? जाणून घ्या कोण आहे तो क्रिकेटर...

dhanashri kadgaonkar in tuzhat jeev rangala episode 907 2019

जानेवारी महिन्यात धनश्रीला मुलगा झाला होता, असे तिने सोशल मीडियावरून सांगितले होते. तेव्हा तिला अनेक फॅन्सनी भरघोस शुभेच्छा दिल्या होत्या. त्या दरम्यान तिने काही फोटोशूट देखील केले होते. ज्याचे फोटोज् तिच्या चाहत्यांना खूपच आवडले होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment