शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर आश्विन कृष्ण तृतीयेस धनत्रयोदशी, जाणून घ्या व्रतकथा, मंत्र, पूजनविधी आणि नियम…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

धनत्रयोदशी/धनतेरस: प्रिय वाचकहो!, आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे काय कारण आहे..निश्चितच आर्थिक अडचणी दूर होऊन घरात भरभराट राहो यासाठी देवाची आराधना…

पूजा धनत्रयोदशीची : आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. या दिवशी वस्त्र आणि अलंकाराची खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी उपवासही केला जातो. घरातले अलंकार तिजोरीतून काढून स्वच्छ करून ते पुन्हा जागेवर ठेवले जातात. धनत्रयोदशीच्या पूजेपूर्वी आणि नंतर दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून घराच्या चारी बाजूला शिंपडावे. याने लक्ष्मीचे आगमन होतं. या व्यतिरिक्त हे पाणी पूजेत सामील लोकांवर देखील शिं’प’डा’वे. याने मन पवित्र आणि वातावरण शुद्ध राहतं….
कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग यांची विधिवत पूजा केली जाते. त्यांना पायसाचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी शक्य असले तितकं दान करण्यात येतं. सायंकाळी तेलाने भरलेला एक दिवा प्र’ज्व’लि’त करून त्याचं पूजन करून तो दिवा घराच्या दाराजवळ आणि धान्याच्या राशीजवळ ठेवला जातो. हा दिवा रात्रभर जळत राहू दिला जातो. त्यामुळे घरात लक्ष्मीचं आगमन होऊन ती स्थिर होते, अशी मान्यता आहे.

सिद्ध मंत्र :

कुबेर मंत्र…
– ओम श्रीं, ओम ह्रीं श्रीं, ओम ह्रीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय: नम:।।
– ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय, धन धन्याधिपतये धन धान्य समृद्धि मे देहि दापय स्वाहा।

लक्ष्मी मंत्र…
– ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:॥
– ओम ह्रीं श्रीं लक्ष्मिभ्यो नमः॥
– ओम श्रीं श्रिये नमः।।

यमदीपदान : या दिवशी यमदीपदान हे व्रतही केलं जातं. यामध्ये धनत्रयोदशीच्या निमित्ताने दीपदान करण्यात येतं. या दिवशी संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर एका पात्रात अन्न ठेवलं जातं. राईच्या तेलाने भरलेला मातीचा दिवा त्यावर ठेऊन दक्षिण दिशेकडे वात करून तो लावला जातो. त्या दिव्याचे विधीवत पूजन करून यमराजांची प्रार्थना केली जाते.

See also  घरात पैसा टिकत नसेल तर करा हा रामबाण उपाय, नक्की आजमावून पहा...

धन्वंतरी जयंती : याच दिवशी धन्वंतरी जन्मोत्सव हे आणखी एक व्रत करण्यात येतं. प्राचीन काळी जेव्हा देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले, तेव्हा धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. याच कारणामुळे धनत्रयोदशीला धन्वंतरी आणि औषधींचे पूजन केले जाते. पुराणांमध्ये धन्वंतरी देवाला भगवान विष्णूंचा अंशावतार मानले गेले आहे. आयुर्वेदाचे प्रवर्तक असलेला विष्णूचा अवतार धन्वंतरी. धन्वंतरी सर्व वेदात निष्णात होते. मंत्र-तंत्रातही विशारद होते. त्यांच्या अलौकिक प्रतिभेने नाना औ’ष’धींचे सार अमृतरूपाने देवांना प्राप्त झालं. त्यामुळे त्यांना ‘देवांचे वै’द्य’रा’ज’ हे पद मिळालं. त्यामुळे संध्याकाळी ईशान्य दिशेकडे तोंड करून धन्वंतराची प्रार्थना केल्यामुळे दीर्घायुष्य मिळतं, असं मानलं जातं. अश्विन मासातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी सण साजरा केला जातो. या दिवसापासून दिवाळी सणाला सुरुवात होते. या सणाच्या दिवशी भगवान धन्वंतरीचे पूजन केले जाते.

धन्वंतरी पूजन विधी : सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. भगवान धन्वंतरी यांची मूर्ती किंवा प्रतिमा पवित्र ठिकाणी स्थापन करून स्वतः पूर्व दिशेला मुख करून बसा. त्यानंतर भगवान धन्वंतरीचे खालील मंत्राचे स्मरण करून आवाहन करावे…

धन्वंतरी मंत्र :

सत्यं च येन निरतं रोगं विधूतं, अन्वेषित च सविधिं आरोग्यमस्य।
गूढं निगूढं औषध्यरूपम्, धन्वन्तरिं च सततं प्रणमामि नित्यं।।

त्यानंतर आचमन करून भगवान धन्वंतरीच्या प्रतिमेवर गंध, अक्षता, फुल, गुलाल अर्पण करावा. चांदीच्या भांड्यात खीर नैवेद्य दाखवावी. (चांदीचे भांडे उपलब्ध नसल्यास इतर कोणत्याही भांड्याचा उपयोग करू शकता). यानंतर पुन्हा आचमन करा. मुख शुद्धीसाठी विड्याच्या पानाचा एक विडा लावून ठेवा. शंखपुष्पी, तुळस, ब्राह्मी इ. पूजनीय औषधी भगवान धन्वंतरीला अर्पण करा.

रोग नाशच्या इच्छेने खालील मंत्राचे स्मरण करा
ऊं रं रूद्र रोग नाशाय धन्वन्तर्ये फट्।।

यानंतर भगवान धन्वंतरीला श्रीफळ अर्पण करून आरती करा.

See also  यंदाच्या वर्षी नवरात्री मध्ये अशाप्रकारे करा घटस्थापना, प्रसन्न होईल देवी दुर्गामाता, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजन विधी...

धनप्राप्ती व धनवृद्धी उपाय : तर या दिवशी भक्त मनोभावे पूजा तर करतात परंतू पूजेसह काही सोपी कामं केली तर धनासंबंधी अ’ड’च’णी दूर करता येऊ शकतात. कारण या दिवशी शुभ कार्य केल्याने त्याच्या १३ पटीने लाभ होतो असेही म्हणतात….

या दिवशी संध्याकाळी १३ दिवे घरात आणि १३ दिवे लावावेत आणि त्याजवळ १३ कवड्या ठेवाव्या. नंतर या कवड्या घरातील एखाद्या कोपऱ्यात दाबून द्या. याने अचानक धन लाभ होण्याचे योग बनतात व दारिद्र्य, काळोख आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

या दिवशी यथाशक्ती घरातील प्रत्येक सदस्यासाठी भेटवस्तू आणावी. कुटुंबातील लोकांसाठी खरेदी करावी… इतर लोकांसाठी गिफ्ट या दिवशी खरेदी करू नये.

जर आपल्याकडे धन टिकत नसेल म्हणजे पैसा तर येतो परंतू काही कारणामुळे खर्च होत असतो तर धनत्रयोदशी ते लक्ष्मी पूजनापर्यंत पूजा दरम्यान देवी लक्ष्मीला एक जोडी लवंगा चढवाव्या.

See also  अरेंज मॅरेज करताना करताना करा फक्त हे काम, लव्ह मॅरेजवाल्यांपेक्षा देखील सुखी आयुष्य जगालं...

या दिवशी साखर, बत्ताशे, खीर, तांदूळ, पांढरे कपडे किंवा पांढर्‍या वस्तूंचे दान केल्याने धनाची कमी होत नाही. अशाने जमा पुंजी वाढते आणि कामात येणारे अडथळे दूर होतात.

या दिवशी किन्नरला दान करावे आणि त्याच्यांकडून एक शिक्का मागून घ्यावा. किन्नरने स्वखुशीने शिक्का दिल्यास तर अजूनच फलदायी ठरेल. हा शिक्का आपल्या पर्स किंवा तिजोरीत ठेवल्याने कधीच धनाची कमी जाणवत नाही.

या दिवशी दारावर गरजू, भिकारी किंवा कोणीही मागणारे आले तर त्यांना रिकाम्या हाती पाठवू नये. त्यांना यशाशक्ती दान करावे.

आपल्या एखाद्या कामात यश मिळवण्याची इच्छा असल्यास धनत्रयोदशीच्या दिवशी त्या झाडाचे डहाळी तोडावी ज्या झाडावर वटवाघळं बसत असतील. ही डहाळी घरातील ड्राइंग रूममध्ये ठेवल्याने समाजात प्रतिष्ठा वाढते आणि धनात वृद्धी होते.

या दिवशी एखाद्या मंदिरात जाऊन केळाचे झाड किंवा एखादे सुवासिक झाड लावावे. जसं जसं झाडं मोठे होईल तसं तसं यश वाढत जाईल.

या दिवशी वाद, भांडण टाळावे. घरात शांती आणि सकारात्मकता राहू द्यावी.

टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment