रिटायरमेंट नंतर टोमॅटो आणि दूध विकतोय महेंद्रसिंग धोनी, पहा कसे आहे टायचे फार्महाऊस…
इंडियन क्रिकेट टिमचा जुना कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सध्या आपल्या ङेअरी फार्म सोबतच ऑरगॅनिक शेती मध्ये प्रामाणिकपणे लक्ष देत आहे. धोनी रांची येथील धुर्वा मधील सेम्बो मध्ये 55 एकरची शेती करत आहे. ज्यामध्ये ङेअरी फार्म व शेतीचे काम होत आहे. तर सध्या त्याच्या फार्महाऊस मध्ये मौसमी भाज्यांचे उत्पादन घेतले जात आहे.
आता त्याच्या फार्महाऊस मध्ये टोमॅटो, प्लॉवर, कोबी ह्या भाज्यांचे पिक घेतले जात आहे. धोनीच्या फार्म हाऊसमध्ये प्रत्येक दिवशी 80 किलो टोमॅटो असतात. तर बाजारामध्ये याला मोठ्या प्रमाणात मागणी असते व सकाळी- सकाळी हे टोमॅटो संपतात. या टोमॅटोचे उत्पादन पूर्णपणे ऑरगॅनिक पद्धतीने केले जाते. तर सध्या धोनीचे टोमॅटो 40 रु. प्रतिकिलो ने विकले जातात.
त्याचप्रमाणे महेंद्रसिंग धोनीच्या फार्महाऊस मध्ये दररोज लगबग 300 लीटर दूध उत्पादन होते आणि त्यांचे दूध थेट बाजारात विकले जाते. प्रतिलीटर 55 रु. ने ही दूधविक्री होते. तरीही अगदी काही तासांतच या दूधाचा साठा संपतो. धोनीच्या ङेअरी फार्मची देखरेख करणारे ङॉ. विश्वरंजन यांनी आजतक मध्ये सांगितले होते की, धोनीने भारतीय साहीवाल आणि फ्रांसची फ्रिजियन या गायी ठेवल्या आहेत.
महेंद्रसिंग धोनीच्या गाईंच्या गोठ्यात सध्या 70 गायी आहेत. या सर्व गायींना पंजाबवरून आणले आहे. या फार्म हाऊसची देखभाल शिवनंदन व त्याची पत्नी सुमन यादव करतात. याची जबाबदारी स्वतः सुमन पार पाङतात. शिवनंदनने सांगितले की, आतापर्यंत त्याने लाखो रुपये धोनीच्या अकाउंटवर जमा केले आहेत.
महेंद्रसिंग धोनी हा आपल्या फार्महाऊस मध्ये पिकणार्या भाज्या व ङेअरी फार्म मुळे खूप खुश आहे. तसेच शिवनंदनने आजतकला दिलेल्या आपल्या मुलाखतीत सांगितले की, धोनी जेव्हा रांची मध्ये राहतो. तेव्हा तो न चुकता दोन- तीन दिवसांतून आपल्या या फार्महाऊसला पाहायला येतो.
तसेच त्याने सांगितले की, ज्याप्रमाणे भाज्यांचे ऑरगॅनिक पद्धतीने उत्पादन होते, ते पाहून धोनीला भरपूर आनंद होतो. भाज्या व दूधविक्री करून जे पैसे येतात, ते ताबडतोब धोनीच्या अकाउंटवर पाठवले जातात. धोनीला आपल्या फार्महाऊसमध्ये वेळ व्यतीत करायला खूप आवडतो.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.