धोनीच्या या जबरदस्त फॅनने बनवले हटके घर, कारण ऐकून थक्क व्हाल!

कुणी काहीही म्हणा, तो काल, आज आणि उद्या सुद्धा महान खेळाडूचं असेल ! कोण ? तर एम एस धोनी..

सध्या धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल मध्ये काही उत्तम खेळ करताना दिसत नाही. त्यामुळे एकीकडून धोनीवर आणि त्याच्या खेळावर टीका ही जास्त प्रमाणात होत आहे.पण अश्यात सध्या एका गोष्टीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेलं आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एखाद्या क्रिकेटरवर असलेलं प्रेम काही नवं नाही. तसा धोनीचा सुद्धा फार मोठा चाहता वर्ग आहे.पण नुसता मोठा चाहता वर्ग असला तरी कोण दिसला याला सध्या महत्व प्राप्त झालं आहे. धोनीचा चेन्नई मधील एक असा चाहता आहे, की सध्या त्याचीचं चर्चा चालू आहे.

तमिलनाडुच्या आरंगूर मधील चेन्नई सुपर किंग्ज फॅन गोपी कृष्णन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या घराचे नाव ‘धोनी फॅन का घर’ असं केलं आहे.

बरं नुसतं नावच नाहीतर, अख्ख घरच त्याने चेन्नई च्या पिवळ्या कलर ने आणि लोगो ने रंगवलं आहे.याची माहिती चेन्नई सुपर किंग्ज ने ट्विटरवर अकाऊंटवर ट्विट करून दिली. त्यानंतर काही वेळातच ही गोष्ट देशभरात व्हायरल झाली.

धोनीच्या या जगावेगळ्या चाहत्याने, प्रेम म्हणजे काय ? हे वेगळ्याच प्रकारे दाखवून दिलं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment