‘कॅप्टन कुल‘ धोनीचा रौद्र अवतार पाहून अंपायरने बदलला होता निर्णय, जाणून घ्या नेमकं काय घडलं त्या मॅचमध्ये…

महेंद्रसिंग धोनी ! नाम तो सुना ही होगा ?

माही, जो कॅप्टन कूल या नावानेही प्रचंड प्रसिद्ध आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. बर्‍याचदा त्यांच्या बर्फासारख्या थंड स्वभावाचे खूप कौतुक होतं. पण याचं कॅप्टन कूलचीही दुसरी वेगळी दुखरी बाजू आहे. जी बाजू जास्तकरून भारतीय घरगुती प्रकारात मोडणारी स्पर्धा म्हणजेच, ” इंडियन प्रीमियर लीग ” मध्ये दिसते.

इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम सध्या युएईमध्ये खेळला जात आहे. अश्यात भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्ज चा कर्णधार खेळाडू वागण्यावरून खूप चर्चेत आहे. ज्यात चांगल्या वाईट प्रकारे “माही” ला ट्रोल ही केलं जात आहे.

आयपीएलच्या यंदाच्या 13 व्या मोसमात धोनीची चेन्नई सुपर किंग्ज टीम खराब स्थितीत आहे. पहिल्या 8 सामन्यांपैकी धोनीच्या सीएसकेने केवळ तीन सामने जिंकले आहेत. मंगळवार 13 ऑक्टोबरला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध संघाला अखेर तिसरा विजय मिळाला.

सीएसकेने हा सामना 20 धावांनी जिंकला. या सामन्यादरम्यान पुन्हा असं घडलं की ज्यामुळे, धोनीने पुन्हा एकदा पंचांच्या निर्णयावर असंतोष व्यक्त केला. असंतोष थोडा सौम्य वाटतो. म्हणजे असंतोष म्हणजे सन्मानाने असमाधानी दर्शवणं. पण धोनीने जे केले ते असमाधानकारक होते, असं सोशल मीडियावर सगळीकडून व्यक्त केलं जात आहे.

सामना 19 व्या ओव्हर मध्ये आला होता. चेंडू शार्दुल ठाकूरच्या हातात होता. विजय मिळवण्यासाठी एसआरएचला दोन षटकांत 27 धावांची आवश्यकता होती. लक्ष्य फार मोठे नव्हते आणि राशिदही मूडमध्ये होता. तो फक्त तीन चेंडूंत 11 धावा खेळत होता. शार्दुलच्या पहिल्याच चेंडूवर राशिदने दोन धावा काढल्या.

ओव्हरचा पुढचा चेंडू स्टंपच्या खूपच बाहेर पडला आणि पंचांनी त्याला वाईड घोषित केला. आता हे मॅच चं प्रकरण 11 चेंडूंत 24 धावा बनलं होतं. सामना अडकलेला दिसत होता. त्याच दरम्यान, शार्दुलचा पुढचा चेंडू पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर होता. रशीदने ते गुंडाळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू आणि बॅट यांच्यात कोणताही संपर्क झाला नाही. बाकीचे काम धोनीने विकेटच्या मागे पूर्ण केले.

पण अंपायर पॉल रायफलने वाईड म्हणून घोषित करण्यासाठी हात पसरवायला सुरुवात केली. हे जेव्हा धोनीने पाहिलं, तेव्हा तो खूप रागात ओरडला. शार्दूल ही संतापात अंपायर कडे बघत होता. धोनी आणि शार्दूलच्या संतापाने वाईड देण्याच्या निर्णयासाठी पसरलेले हात शेवटी अंपायर ने आखडले.

धोनीच्या कृतीमुळे इंटरनेटवर लोक, चाहते खूप निराश झाले आणि अश्यातच पंच या शब्दाचा ट्रेंड होऊ लागला. बर्‍याच लोकांचा असा विश्वास होता की या प्रकरणात धोनीचा काही दोष नाही. तो पंचांच्या निर्णयाविरोधात निषेध नोंदवू शकतो; पण त्याचा निषेध झाल्यानंतर ज्या पद्धतीने निकाल बदलला तो मात्र नक्कीच निराशाजनक होता.

आपल्या सौम्य अश्या थंड स्वभावासाठी लोकप्रिय असलेला ” धोनी ” या आयपीएल मध्ये दुसऱ्यांदा पंचांच्या निर्णयावर भडकला. तर असं आहे, हे प्रकरण..त्यामुळेच म्हंटल होतं, धोनी ! नाम तो सुना होगा !..

Leave a Comment