दिलीपकुमार, देव आनंद, नर्गिस यांच्यासह “या” कारणांमुळे नाहीच झाला राज कपूरचा “संगम”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

होय मित्रांनो! सर्वप्रथम दिलीप कुमार यांना ऑफर झाला होता राज कपूर यांचा संगम चित्रपट. नंतर देव आनंद आणि हिरोईन साठी संजय दत्तची आई नर्गिस यांनी सुद्धा नाकारला होता राज कपूरचा ‘संगम’ चित्रपट की ज्या चित्रपटाने निर्मितीच्या आठ पट गल्ला जमविला होता बॉक्स ऑफिसवर. जाणून घेऊ या की दिलीप कुमार यांनी राज कपूरचा हा सुपरहिट चित्रपट का केला नाही?

9

राज कपूर दिग्दर्शित ‘संगम’ हा चित्रपट १९६४ मध्ये रिलीज झाला आणि त्याला निर्मितीसाठी बराच कालावधी लागला होता. बॉलिवूडमध्ये त्यावेळी राज कपूर, दिलीप कुमार आणि देव आनंद या तिघांचेही स्टारडम व वर्चस्व होते जसे सध्या सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांचे वर्चस्व आहे. दिलीप, राज आणि देव यांच्यातही स्पर्धा होती, पण त्यात क’टु’ता नव्हती. तथापि, त्यांचे चाहते मात्र आपसात चांगलेच भां’ड’त असत आणि आपल्या प्रिय स्टारला अधिक चांगलेच फेमस करण्यात ते कोणतीही क’स’र सो’ड’त नसत.

See also  अनुष्का ऐवजी 'या' मुलीसोबत लग्न करणार होता विराट कोहली, पण विराटच्या आईने केले असे काही की...

जेव्हा राज कपूर यांनी संगम बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना दोन नायक आणि एका नायिकेची आवश्यकता भा’सू लागली. स्वतः राज कपूरला एक भूमिका करायची होती आणि दुसऱ्या भूमिकेसाठी दिलीप कुमार हवे होते. दिलीप आणि राज यांनी यापूर्वीही अंदाज नावाचा चित्रपट केला होताच.

dev dilip 1336566634

राज कपूर दिलीपकुमारला साईन करायला गेले. त्यांनी स्क्रि’प्ट व एक कोरा चेक घेतला. त्यांनी दिलीपकुमारला सांगितले की, फिल्मची स्क्रिप्ट वाचा , पाहिजे तो आवडीचा रोल घ्या. कोऱ्या चेक वर पाहिजे तितके पैसे लिहा आणि हा चित्रपट साईन करा.

दिलीपकुमार यांनाही पटकथा आवडली, परंतु त्यांनी चित्रपट करण्यास न’का’र दिला. ते म्हणाले की, जर त्यांनी हा चित्रपट केला तर त्याचे आणि राज कपूरचे चाहते आपापसांत भांडतील आणि याचा परिणाम नंतर त्यांच्या दोघांमधील निखळ मैत्रीच्या नात्यावरही होऊ शकतो. उगाच एका फिल्मसाठी आयुष्यभराचा वा’ई’ट’प’णा नको.

See also  अभिनेता के.के. गोस्वामीची पत्नी आहे खूपच सुंदर, सुंदरतेच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींना देखील देते ट'क्कर...

dc2c1ef74643331f3ab9521428c7cee4

तसेच, दुसरी गोष्ट अशी आहे की, दिलीपकुमार यांनी राज कपूर यांच्यासमोर एक वि’चि’त्र अ’ट ठेवली होती की, या फिल्मचे फायनल एडिटिंग मात्र दिलीपकुमार स्वतः करतील. या अटीस अर्थातच राज कपूर यांनी नकार दिला. अशा तऱ्हेने दिलीपकुमार यातून बा’हे’र प’ड’ले.

दिलीपकुमार यांनी न’का’र दिल्यानंतर राज कपूरने देव आनंदला चित्रपटाची ऑफर दिली पण त्यांनी ती नाकारली. बंगाली चित्रपटांचा स्टार उत्तम कुमारलासुद्धा घेण्याचा प्रयत्न केला, पण तो ही आला नाही. अखेर या चित्रपटात राज कपूरसमवेत राजेंद्र कुमार झ’ळ’क’ला.

नायिका म्हणून सुद्धा वैजयंतीमाला ही पहिली पसंती नव्हतीच. राज कपूरला नेहमीप्रमाणे नर्गिसलाच घ्यायचे होते, परंतु काही खाजगी कारणांस्तव त्यांनीही हा चित्रपट करण्यास न’का’र दिला होता. .

See also  राज कुंद्राने १२ वर्षांनंतर केला खुलासा, म्हणाला, "शिल्पावर आरोप लावण्यासाठी माझ्या पहिल्या बायकोने"

महत्वाचे असे की, जो संगम इतक्या सर्वांनी सो’डू’न दिला त्या चित्रपटाने त्याच्या निर्मितीच्या संपूर्ण किमतीपेक्षा आठपट जास्त व्यवसाय केला. चित्रपटाने त्या काळात बॉक्स ऑफिसवर ८ कोटी रुपयांचा गल्ला जमविला होता जो आजच्या हिशोबाने चक्क सुमारे ७०० कोटींचा आहे. असो…!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment