नवरीच्या शृंगारात मुक्ता बर्वे ला तुम्ही पाहिलंत का, गोजिरीसाजिरी नवरी दिसते खूपच भन्नाट, पाहा तिचे फोटोज्
मराठी सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचे सध्या नवरीच्या शृंगारातील मनमोहक अंदाजातील फोटोज् सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. त्यामुळे अरेच्चा, मुक्ता गुपचूप लग्न करते की काय?? अशी चर्चा बहुतांश लोकांमध्ये होताना दिसत आहे. हल्ली तिच्या लग्नाची जोरदार तयारी होताना सोशल मीडियावर दिसत आहे. मात्र खरं सांगायचं तर मुक्ता ने अजूनतरी आपल्या खऱ्या आयुष्यात लग्न केलेले नाही.
अभिनेत्री मुक्ता बर्वे ही “अजूनही बरसात आहे” या मालिकेत मीराची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील मीराच्या भूमिकेने चाहत्यांच्या मनावर तुफानी जादू केली आहे. त्याचप्रमाणे या मालिकेत मुक्ता सोबत अभिनेता उमेश कामत हा प्रमुख भूमिकेत आहे. तर सध्या मालिका एका नवीन वळणावर आली आहे.
यामध्ये मीरा व आदिराज कित्येक वर्षांनंतर एकमेकांच्या आयुष्यात परतले आहेत. आदिराज हा घरच्यांच्या दबावाखाली सानिका सोबत साखरपुडा करण्याच्या तयारीत होता. परंतु तेव्हाच ऐनवेळी मीरा तेथे पोहोचते आणि त्यांचा साखरपुडा मोडते. इतकंच नव्हे तर सानिका चे वडील ङॉ. वैश्यंपान यांचे ती खरंखुरं रूप समोर आणते. त्यामुळे अखेर हे लग्न मोडते.
त्यानंतर आदिराज ची आई मीरा च्या घरी आदिराज च्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जाते. त्यामुळे आता लवकरच मीरा व आदिराज हे एकमेकांसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. हे पुढील भागात पाहायला मिळते. परंतु अभिनेत्री मुक्ता बर्वे चा नवरीच्या रूपातील हा सुंदर लुक सोशल मीडियावर सध्या वायरल होताना दिसत आहे. या लुकमध्ये मुक्ता कमालीची सुंदर व मोहक दिसत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.