“तारक मेहता…” मधील जेठालालने खरेदी केली आलिशान लक्जरी कार, किंमत ऐकूनच व्हाल तुम्हीपण थक्क!
“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय शो आहे. यामधील जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे सर्वांचे फेवरेट आहेत. यंदाच्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी एक लक्जरी कार खरेदी केली आहे. काळ्या रंगाची किआ सोनेट सबकॉम्पैक्ट एसयुवी ही कार घेतली आहे. सणाच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या घरातील या नवीन पाहुण्याचं स्वागत केले आहे. दिलीप जोशी यांची ही लाखो किंमतीची कार पाहून फॅन्सचा तर उत्साह गगनात मावेनासा झाला आहे.
दिपावलीच्या शुभमुहूर्तावर दिलीप जोशी यांनी आपल्या घरी नवीन ब्रँड आलिशान कारचे स्वागत केले आहे. सोशल मीडियावर त्यांनी आपल्या या नवीन कारचे फोटोज् शेयर केले आहेत. त्यामुळे त्यांचे फॅन्स त्यांना दिपावलीच्या शुभेच्छा देण्यासोबतच नवीन कार साठी खूप खूप शुभेच्छा देत आहेत. मात्र दिलीप जोशी यांचे फॅन्स तेव्हा थबकले, जेव्हा त्यांना दिलीप जोशी यांच्या कारची किंमत माहित झाली. तुम्हांला ठाऊक आहे का, दिलीप जोशी यांनी खरेदी केलेल्या या कारची किंमत 12.29 लाख रुपए आहे.
काय आहेत ह्या कारचे फीचर्स : दिलीप जोशी यांनी खरेदी केलेल्या नवीन लक्जरी कारचे फीचर्स खूप कमालीचे आहेत. या सबकॉम्पैक्ट एसयुवी ची पॉवर 1.2 लीटर पेट्रोल, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर ङिझेलचे इंजिन आहे. इतकंच नव्हे तर या कारच्या आतमध्ये 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड आईएमटी, 7 स्पीड ङीसीटी आणि एक टॉर्क कन्व्हर्टर आहे. या कारचे मॉडेल खूप जबरदस्त आहे. तसेच तिची बॉङी सुद्धा अतिशय मजबूत आहे. या कारचा लुक पाहूनच फॅन्स अक्षरशः दिवाने झाले आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.