‘तारक मेहता…’ मालिकेवर या मोठ्या कारणामुळे खूपच संतापलाय जेठालाल, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

सब टीव्ही वरील तुफान लोकप्रिय आणि रेकॉर्ड ब्रेक विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील रसिकप्रिय पात्र जेठालाल म्हणजेच अभिनेता दिलीप जोशीला वाटतंय की, बदलत्या काळानुसार आणि मागणीनुसार सिरीयलच्या लेखनावर आणि विषयांच्या मांडणीवर फार वाईट प्रभाव पडला आहे आणि सध्याच्या या स्पर्धात्मक काळामध्ये जास्त एपिसोड टेलिकास्ट करण्याच्या नादात आता मनोरंजन करणारी मालिका, ही इंडस्त्री सर्वच एक मोठी फॅक्टरी झाली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’वर ‘जेठालाल’ दिलीप जोशी नाराज होत म्हणाला की,” मालिकेची क्वालिटी घसरली आहे. पहिल्यासारखी मजा येत नाहीय.” गेल्या काही एपिसोडपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मनोरंजक विनोदी मालिकेचा टीआरपी सतत कमी होत आहे.

READ  अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्ना बद्दल केला मोठा खुलासा, म्हणाला, 'लग्नाच्या पहिल्या रात्रीच...'

आणि मुख्य म्हणजे आता तर एके काळी टॉपला असणारा हा टीव्ही शो अंतिम टॉप ५ मधूनही बाहेर गेला आहे. याची कारण मीमांसा करतांना अभिनेता दिलीप जोशीला असं वाटतं की, बदलत्या वेळेनुसार मालिकेच्या लेखनावर एकूणच फार वाईट प्रभाव पडला आहे आणि ही मालिका आता जास्तीत जास्त एपिसोड टेलिकास्ट करण्याच्या नादात एक फॅक्टरी प्रमाणे झाली आहे.

नुकत्याच एका प्रथितयश चॅनलला दिलेल्या मुलाखतीत स्टॅंड-अप कॉमेडिअन सौरभ पंतसोबत बोलताना दिलीप जोशी म्हणाला की, ‘जेव्हा तुम्ही कॉन्टिटी बघता तेव्हा कुठे ना कुठे क्वालिटी प्रभावित होतेच. हेच मुख्य कारण आहे की मला संताप येतो.

कारण रसिक मायबाप प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या क्वालिटी मध्ये मला कधीच तडजोड मान्य नाही. आधी आम्ही शो आठवड्यातून एक दिवस करत होतो आणि रायटर्सकडे बराच वेळ राहत होता. चार एपिसोड लिहिले की, दुसरे चार एपिसोड पुढील महिन्यात शूट करायचे होते’.

READ  ध'क्कादायक ! बॉलिवूड मधील या प्रसिद्ध दिग्दर्शकच्या पत्नीने आणि मुलीने केली आ'त्म'ह'त्या, कारण...

आधीच्या काळात व्हायचे असे की आमच्या लेखकांना नवनवीन विषय शोधणे, त्यावर संशोधन करून, त्याची मनोरंजक पद्धतीने मांडणी करण्यासाठी पर्याप्त वेळ उपलब्ध होता. आधी विषय, मग चर्चा, तो विषय फुलविणे, विनोदाच्या जागा, पंचेस इ. शोधणे.

यामधून सामाजिक बांधिलकी जपतांनाच आपल्या रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करतांनाच त्यांचे प्रबोधन अथवा एखादा छानसा सामाजिक संदेश काय देता येईल? याचा सर्वंकष विचार व्हायचा. आणि इतके सगळे केल्यावर अर्थातच एपिसोड जबरदस्त व्हायचाच.

दुर्दैवाने आता तसे घडतांना दिसत नाही. त्यामुळे मनांत कुठेतरी एक कमतरता जाणवते की अजून चांगले होऊ शकले असते हे. पण वेळ कमी असल्यामुळे यंत्रासारखे काम चालते. जास्तीच्या नादात दर्जा घसरतोय हीच खरी खंत आहे. आणि त्यामुळेच मी नाराज आहे. असे जेठालाल म्हणतात.

READ  या बॉलीवूड कलाकारांच्या वाईट सवयींमुळे खूप परेशान आहेत त्यांचे शेजारी, या अभिनेत्याने केली होती लिफ्ट मध्ये लघवी...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment