दिलजीत दोसांझने शेयर केला शहनाज गिलचा फोटो, जाणून घ्या नक्की काय आहे हे प्रकरण
अभिनेत्री शहनाज गिल ही मागील काही दिवसांपासून खूप कठीण परिस्थितीतून जात आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला च्या नि’धनानंतर त्याच्या आठवणींमधून ती स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. 2 सप्टेंबरला सिद्धार्थ देवाघरी गेला. त्याच्या नि’धनाची बातमी ऐकून संपूर्ण टेलिव्हिजन आणि बॉलीवुड इंडस्ट्रीला ध’क्का बसला. त्यानंतर काही दिवसांनी तर असे ऐकायला आले होते की, शहनाज गिल ने ही मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला.
मात्र हल्लीच ती आपल्या “हौंसला रख” या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पब्लिक मध्ये येत आहे. सर्व गोष्टींना तिने काही काळासाठी पूर्णविराम दिला आहे. तरीही बिचारी फिल्म प्रमोशन च्या वेळी थोडीशी नाराज दिसत होती. त्यामुळे तिचे फॅन्स तिच्या त्या हसत्या-खेळत्या चेहऱ्याच्या प्रतिक्षेत आहेत.
दिलजीतने शेयर केले फोटोज् :
अभिनेत्री शहनाज गिल हिचे सगळे फॅन्स अणि इंङस्टीमधील तिचे फ्रेंड्स हे तिला सपोर्ट करत आहेत. याचदरम्यान को- स्टार दिलजीत दोसांझ याने सुद्धा शहनाज गिल ला सपोर्ट करत सोशल मीडियावर तिचा फोटो शेयर केला आहे. त्याचसोबत त्याने शहनाज ला “स्ट्राँग वुमन” असे देखील म्हटले आहे. तसेच दिलजीतने शहनाज च्या “इनर स्ट्रेंथ”वर पोस्ट लिहिली आहे.
आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दिलजीत दोसांझ याने शहनाज चा फोटो पोस्ट करून लिहिले आहे की, “शुक्रिया शहनाज गिल, तू एक शक्तीशाली महिला आहेस. नेहमी अशीच मजबूत व धैर्यशील राहा.” त्याचप्रमाणे दिलजीत दोसांझ ने आपले बाकी को स्टार आणि संपूर्ण टीमचे सुद्धा फिल्मसाठी धन्यवाद व्यक्त केले.
तुम्हांला ठाऊक आहे का, नुकतेच “हौंसला रख” या फिल्म चे पहिले साँग “सरूर” रिलीज झाले. प्रेक्षकांचा या गाण्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. या गाण्यात दिलजीत दोसांझ आणि शहनाज गिल हे दोघे दिसत आहेत. या फिल्म मध्ये शहनाज गिल चा बेबी शॉवर सुरू असतो. ज्यामध्ये परिवार आणि मित्र- मैत्रीणी सहभागी झालेले असतात. त्याचप्रमाणे या फिल्म चा जेव्हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला, तेव्हा फक्त 2 दिवसांतच या ट्रेलरला 13 मिलियन व्यूज मिळाले होते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.