मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद हिने व्यक्त केल्या आपल्या भावना; ती म्हणते की,”परजातीत लग्न केले म्हणून लोकांना होतो त्रास….”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“प्रेमाला नसावी कोणतीही बंधने, फक्त जुळावीत दोन हृदयांची स्पंदने”. मित्रांनो प्रेम, इश्क, मोहब्बत काहीही म्हणा. पण नाही नाही म्हणता म्हणता ते अखेर होऊन जाते. आता प्रेम कुणीही कोणावर ठरवून तर करत नाही. ते बस्स…असचं होऊन जातं. पण आपल्या या ढोंगी समाजात प्रेमाचा व प्रेमाच्या नात्यांचा नेहमी तिरस्कार केला जातो. मग ते जाती मध्ये असो किंवा परजाती मधील असो.

Deepali Sayyad Images 1 e1532947556971

अहो पण तुम्हांला काय वाटतं.. परजातीचा पार्टनर असल्यावर फक्त तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांनाच समाजाचा त्रास भोगावा लागतो का? तर असे मुळीच नाही. कारण बॉलीवुड पासून ते अगदी मराठी सिनेसृष्टीमधील लोकांना सुद्धा परजातीमध्ये विवाह केल्यामुळे कुटुंबियांसोबतच समाजाचा देखील त्रास सहन करावा लागतो. आज आम्ही तुम्हांला अशाच एका अभिनेत्रीची दर्दभरी कहानी सांगणार आहोत.

See also  प्रसिद्ध मराठी गायिका अंजली गायकवाडने केला 'इंडियन आयडॉल' विषयी मोठा खुलासा, ऐकून विश्वासच बसणार नाही...

आपल्या अप्रतिम ङान्स च्या कौशल्यावर अखंड महाराष्ट्राला वेड लावणारी मराठमोळी लाखात एक सुंदर शोभून दिसणारी अभिनेत्री दिपाली सय्यद. दिपालीने आपल्या नृत्याच्या ठेक्यावर चाहत्यांना वेडेपिसे केले आहे. ती आपल्या सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते. आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहण्यासाठी ती अनेक नवनवीन पोस्ट आपल्या अकाउंटवर शेयर करते. हल्लीच तिचा एक काळजावर घाव करणारा व्हिडिओ सर्वत्र प्रचंड वायरल होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून “लोक आपल्याकडे या दृष्टिकोनातून पाहतात,” असे तिने स्पष्ट सांगितले आहे.

navbharat times

आपल्या मुलाखतीमध्ये दिपाली सय्यद बोलत होती की,”मी लग्नानंतर दिपाली भोसले ची दिपाली सय्यद झाले. परंतु माझ्या या आडनावाचा मला काहीच त्रास न होता तो लोकांना जास्त होतो. एवढंच नव्हे तर मग त्यानंतर माझे कुटुंबीय, माझे संस्कार, माझे राहणीमान याविषयी चर्चा सुरू होतात. मात्र मी या गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाही. कारण मी नेहमी स्वतःच्या नियमांप्रमाणे चालते.”

See also  मराठी कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेवर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे खूपच जवळच्या व्यक्तींचे झाले नि'धन...

अभिनेत्री दिपाली सय्यद ही एका मराठी कुटुंबात जन्मली असली तरीही तिने कोणत्याही मराठी माणसासोबत लग्न न करता दिग्दर्शक बॉबी खान यांना आपला जोडीदार बनवले. 2008 साली बॉबी खान सोबत दिपालीने आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली.

a3fb61061465a56465770676746b00b2

लग्नानंतर तिचे नाव “सोफिया जहांगीर सय्यद” असे ठेवण्यात आले. आपल्या लग्नानंतर दिपाली अभिनयात फारशी रमली नाही. कारण आपल्या सुखी संसारात व मुलांमध्ये ती व्यस्त झाली. पण तिचे सिनेसृष्टीतील प्रेम मात्र किंचित सुद्धा कमी झाले नाही. म्हणून तर आपल्या लग्नानंतर देखील ती चित्रपट व विविध रियालिटी शो च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करते.

तुम्हांला कदाचित ठाऊक नसेल पण दिपाली ला समाज कार्याची अगदी सुरुवातीपासूनच आवड आहे. त्यामुळे ती अनेक सामाजिक कार्यक्रमांत हिरीरीने सहभागी होते. अभिनयाव्यतिरिक्त तिने आता राजकारणात देखील पाऊल टाकले आहे. समाजातील स्त्रियांच्या समस्या, गरीब लोकांचे प्रश्न अशा कित्येक समस्या ती आपणहून सोङवते.

See also  हा फोटोतील लहान मुलगा आज आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता, अभिनेत्याचे नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

maharashtra times

अभिनेत्री दिपाली सय्यद हिने मुंबईचा ङबेवाला, लाङी-गोङी, होऊन जाऊ दे, करायला गेलो एक, ढोलकीच्या तालावर, उचला रे उचला, वेलकम टू जंगल आणि मला एक चानस हवा अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. तर आता तिने आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment